ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
नेलपेंट लावायला कुठल्या मुलीला आवडत नाही. पण नेल आर्ट म्हटलं की काहीतरी खूपच अवघड असेल असं वाटतं ना? मग एक सोप्पी ट्रिक आज बघूया. साहित्य: नेलपेंट, सेलो टेप. कृती: 1) तुमच्याकडे बारीक सेलोटेप असेल तर उत्तम नसेल तर ज्या कुठल्या साईजची असेल त्याच्या अगदी बारीक म्हणजे पट्ट्या कापून घ्या. 2) आता नखांवर कुठलही डार्क शेडचं नेलपेंट लावा. 3) ते वाळल्यावर नखांवर कापलेल्या सेलोटेप्स आडव्या चिकटवा. 3) त्यांची दोन्ही बाजूंची टोकं बोटावर चिकटवायला हवीत. 4) आता तुमच्या आवडीचं लाईट कलरचं नेलपेंट त्यावर लावा. 5) हा दुसरा रंगही व्यवस्थित वाळू द्या.