दर वेळी आपण काहीतरी छान केलं की आईबाबा आपल्याला बक्षीस देतात. सध्या तेही घरातच आहेत, त्यामुळे तेही कंटाळून जातात. मग आईने केलेला स्वयंपाक छान झाला असेल, किंवा बाबाने घासलेली भांडी अगदी लख्ख निघाली असतील तर त्यांनाही तुम्ही छान छान शाबासकी द्या की ! त्यांनाही बरं वाटेल. त्यासाठी मस्त मेडल्स बनवली तर?साहित्य: घरात असलेला पुठ्ठा किंवा कुठलाही जाड कागद, साधा पांढरा कागद. अगदी जुन्या वहीचा रेघारेघांचा कागदी चालेल. रंग, कात्री, रिबिन्स. रिबिन्स नसतील तर साधा दोरा. रंगीत दोरे असतील घरात तर ते. कृती: 1) साध्या पांढ?्या कागदाचे स्टार्स कापून घ्या. 2) पुठ्ठ्यावर किंवा जाड कागदावर ते चिकटवा.3) तुम्हाला हव्या त्या रंगाने रंगवा. 3) त्यावर काही लिहायचं असेल तर लिहा. उदा. ऑल द बेस्ट, वेल डन. बेस्ट आई, बेस्ट बाबा असं काहीही. 4) एकदा हे स्टार्स वाळले कि कापून घ्या. 5) स्टार्सच्या वरच्या टोकावर एक छोटं भोकी पाडा. 6) या भोकातून रिबीन किंवा रंगीत दोरा ओवा आणि गळ्यात घालता येईल इतपत उंच करून दोन्ही टोकं एकत्र करून गाठ बांधून टाका. 7) असे भरपूर स्टार मेडल्स तयार करा.
आईबाबा चांगले वागले तर त्यांना मेडल द्यायला नको ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:31 IST
आई-बाबांना द्या मेडल्स!! त्यांना टाकू की खुष करून, काय?
आईबाबा चांगले वागले तर त्यांना मेडल द्यायला नको ?
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग