निरनिराळ्या प्रकारचे खूप सारे कानातले मुलींकडे असतात. लटकन, टॉप्स आणि काय काय. एकाच डबीत सगळे ठेवले तर आयत्या वेळी एकतर सापडत नाहीत किंवा एकमेकांत जाम गुंतून बसतात. आता तुम्ही बसल्या बसल्या कानातल्यांसाठी मस्त स्टॅन्ड बनवू शकता. साहित्य: कार्ड बोर्ड किंवा जाड पुठ्ठा, पेन्सिल, पट्टी, कर्कटक , रंग कृती:1) तुमच्याकडे किती कानातल्यांचे जोड आहेत ते मोजा. 2) त्या अनुषंगाने कार्डशीट किंवा पुठ्ठ्याचा तुकडा घ्या. 3) एकावेळी ए फोर आकाराच्या कागदापेक्षा मोठा नको, किंवा त्याहीपेक्षा लहान चालू शकेल. 4) आता एक सेंटिमीटरवर उभ्या आणि आडव्या रेषा मारून घ्या. 5) प्रत्येक एक सेंटिमीटरवर जिथे उभ्या आणि आडव्या रेषा एकमेकांना छेदतात तिथे पेन्सिलने डार्क टिम्ब काढा.6) आणि कर्कटकने त्यावर छिद्र पाडा. हे छिद्र कानातल्याची काडी जाईल इतपत असायला हवं.
कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:11 IST
हे मुलींच्या उपयोगाचं आहे, पण मुलगेही बनवू शकतातच की!
कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग