- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य : घरात असलेल्या अंकुरित होऊ शकणा?्या धान्याच्या बिया- उदा. गहू, बाजरी, मूग, मटकी, हरभरा इत्यादी प्रत्येकी एक वाटी. ताणकाटा, काचेची बरणी/बाऊल, कापडाचा तुकडा किंवा रुमाल, चाळणी, पिण्याचे पाणी इत्यादी. कृती:-1. वाटी भर निवडलेले धान्य घ्या. त्याचे वजन करा. 2. धान्य कोमट पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. धुतलेले धान्य वाडग्यात किंवा बरणीत ठेवा. ते पाण्यात बुडेपयर्ंत वाटीवाटीने पाणी घाला. किमान 3 वाट्या पाणी घ्या 3. एक स्वच्छ कापड, रबर बँड वापरून, बरणीच्या तोंडावर घट्ट बांधा. बरणी अंधारात 24 तास ठेवा. त्यानंतर बरणी बाहेर काढा. 4. पाण्याच्या रंगात काही फरक पडला का बघा? आता चाळणी एका पातेल्यावर ठेवून पाणी गाळून घ्या. गाळलेले पाण्याचे आकारमान मोजा 5. फुगलेल्या धान्याचे आकारमान मोजा. फुगलेल्या धान्याचे वजन करा 6. आता धान्य परत बरणीत ओता व बरणीच्या तोंडावर कापड बांधा. बरणी परत अंधारात ठेवा.