शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांना' तुमची गरज आहे, 'त्यांच्यासाठी' एवढं कराल का, रोज ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 07:00 IST

आता रस्त्यावर माणसं नाहीत, खूप ऊन पडतंय, तर याची फार्फार गरज आहे!

ठळक मुद्दे. हे तुम्ही रोज कराल का?

तुम्ही एखादी गोष्ट ठरवून सलग किती दिवस करू शकता? दोन दिवस? आठ दिवस? महिनाभर? एक वषर्ं?खरं खरं सांगायचं. म्हणजे एखादं काम तुम्हाला जर का मनापासून पटलं तर तुम्ही किती काळ ते रेग्युलरली करू शकता? आता यात दात घासणो वगैरे मोजू नका प्लीज. नाहीतर म्हणाल की ते आम्हाला पटलंय तर आम्ही कित्ती वषर्ं रोज करतोय. असं नाही. खरं काम. कारण तुमच्या आईवडिलांना जर विचारलं, तर ते म्हणतील की, ’तो / ती नाङ्घ काही सांगू नका त्याचं. दोन दिवससुद्धा दम टिकणार नाही. दहा वेळा आठवण केल्याशिवाय एक कामसुद्धा धड करत नाही!’-  इत्यादी इत्यादी..मग आता आईवडिलांना दाखवून द्यायचं का, की ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्या तुम्ही रोज करू शकता?- काम सोपं आहे. अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही आजवर अनेक वेळा त्याबद्दल ऐकलं पण असेल. यापूर्वी ब?्याचदा ते केलं पण असेल. पण यावेळी त्यात महत्वाचं आहे ते  ‘रोज करणं’. अगदी परत शाळा सुरु होईपयर्ंत!

आणि काम काय? तर पक्ष्यांसाठी गॅलरीत किंवा गच्चीत पाणी आणि खायला दाणो ठेवायचे. आधीच उन्हाळा, त्यात एरवी सगळीकडे असणारी माणसांची वर्दळ नाही म्हंटल्यावर प्राणी आणि पक्ष्यांचे दुप्पट हाल होणार आहेत. तुम्ही जर रोज त्यांच्यासाठी खाणं आणि पाणी ठेवलंत तर काही दिवसांनी त्यांना त्याची सवय होईल. मग ते अजून पक्ष्यांना घेऊन येतील. फक्त एक काम करायचं. पाणी ठेवतांना पसरट टब मध्ये ठेवायचं आणि त्यात मध्ये एखादा दगड किंवा विटेचा तुकडा ठेवायचा. पक्ष्यांना पाणी प्यायला लागतं, तसं आंघोळीला पण लागतं.तुम्ही जर ग्राऊंड फ्लोअरला राहत असाल, तर प्राण्यांसाठीही एखादी बादली भरून पाणी ठेवा. एवढेच दोन महिने त्यांच्याहीसाठी अवघड असतात.तुम्हाला हे काम महत्वाचं वाटेल यात शंका नाही. ते तुम्ही सहज करू शकाल यातही शंका नाही. प्रश्न इतकाच आहे की रोज कराल का?