लोक करोनाच्या नावाने उगाच आरडाओरडा करतायत. त्यांना वाटतंय की मुलांचा फार अभ्यास बुडाला. पण खरं म्हणजे मार्च एन्ड, शाळेत सगळा अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण झालेलाच असतो. फक्त तुम्हाला यावर्षी परीक्षा द्यायला लागली नाही इतकंच काय ते! पण तरीसुद्धा आईबाबांना वाटतंय की तुम्हाला फार मोठी सुट्टी मिळाली आहे आणि त्या सुट्टीचा प्रत्येक क्षण तुम्ही काहीतरी चांगलं शिकण्यात खर्च केला पाहिजे. शाळांनी तर परीक्षा नाही म्हणून पार एप्रिल संपेपयर्ंत पालकांना मेसेज पाठवून तुम्हाला घरचा अभ्यास दिला असणार. तुम्हीही तशी शहाणी मुलं असल्यामुळे तुम्हीही आईवडील सांगतात त्या सगळ्या गोष्टी करत असणार. त्या ऍक्टिव्हिटीज करत असणार. पण या सगळ्या गोंधळात मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेली एक ऍक्टिव्हिटी पूर्णपणो राहून गेलेली आहे. आणि ती ऍक्टिव्हिटी इतकी महत्वाची आहे, की ती केली नाही तर तुम्हाला नव्या भारी आयडिया कश्या काय सुचणार?
आज सब काम बंद , बोल दो हम आराम करेंगे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:50 IST
म्हणजे काहीच न करणे. थोडक्यात सांगायचं तर रिकामं बसणे.
आज सब काम बंद , बोल दो हम आराम करेंगे !
ठळक मुद्दे ‘काही न करण्यासाठी’ थोडा वेळ राखून ठेवायला विसरू नका!