राजीव तांबे
गारेगार पाण्याची माळसाहित्य : बर्फाचे 10 खडे, 1 मीटर. जाड दोरा, एक वाटी मीठ, एक चमचा, एक मोठी प्लेट.तर मग करा सुरू :1. एका प्लेट मधे बफार्चे दहा खडे घ्या.2. एका बर्फाच्या खड्यावर अर्धा चमचा मीठ शिंपडा.3. लगेचच त्या बर्फाच्या खड्यावर जाड दोरा आडवा ठेवायचा. 4. आताहादोरा सावकाश खाली दाबायचा.5. मग चार सेकंद थांबायचं व दोरा वर उचलायचा.6. दोयरबरोबर बफार्चा खडा पण उचलला जाईल.7. म्हणजेच आपल्या गारेगार माळेतला एक पाणी-मणी ओवला गेला.8. असं भराभर केलं की. . झाली आपली पाण्याची माळ तयार !