शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डॅरिअस म्हणतो , मला बो -टाय बनवून प्राण्यांना मदत करायची आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:09 IST

डॅरिअस ब्राऊनचे बो टाय

ठळक मुद्देडॅरिअससारखी इच्छाशक्ती असली की मदतीचा मार्ग आपोआपच दिसतो. 

डॅरिअस ब्राऊन नावाचा मुलगा. तो  अमेरिकेतल्या न्यू जर्सीत राहातो. त्याला इतरांना मदत करण्याची फार आवड. डॅरिअसला मोटर स्कील जरा कमी होते. त्याला पटकन टाय बांधणं, बुटाच्या लेस बांधणं जमायचं नाही. त्याच्या आईनं ठरवलं की त्यानं जास्तीत जास्त हातानं काम केलं तर त्याला हे नीट जमू शकेल. म्हणून डॅरिअसच्या आईनं त्याला त्याच्या मोठ्या बहिणीला मदत करायला सांगितलं. त्याची मोठी बहिण ही हेअर स्टायलिस्ट होती. आणि ती केसांना लावायचे बो स्वत: तयार करायची. डॅरिअस तिला बो बनवण्यासाठी कापड कापून द्यायचा. मशीनवर शिवण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसातच डॅरिअसच्या बहिणीला लक्षात आलं की तो बनवत असलेल्या बोचा विशेष उपयोग होणार नाही. म्हणून तिनं त्याला एक कापडाची पट्टी दिली आणि तू तुला घालायला बो टाय बनव असं सांगितलं. तीन वर्षापूर्वी डॅरिअसनं त्याचे बो टाय बनवायला सुरूवात केली. 2017 मध्ये  टेक्सास आणि फ्लोरिडामधे   हार्वे आणि  इर्मा नावाची वादळं आली होती. या वादळामुळे झालेलं नुकसान डॅरिअसनं टी.व्हीवर पाहिलं. वादळात ज्यांच्या घरांच नुकसान झालं, जी लोकं बेघर झाली त्यांना मदत करण्याची डॅरिअसची इच्छा होती. पण त्याची आई त्याला म्हणली की या लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. अडचणीत असलेल्यांना मदत करायची असेल तर आपण काही वस्तू बनवून देऊ शकतो. तू काय देऊ शकतोस? असं त्याच्या आईनं त्याला विचारलं. थोडा वेळ  विचार केल्यावर  डॅरिअसनं आपण स्वत: तयार केलेले बो देऊ शकतो असं सांगितलं.डॅरिअसच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या आईला समजला नाही. मग डॅरिअसनंच आईला समजावलं की मी या वादळात अनेक कुत्रे, मांजरं हे बेघर झाली आहेत. ती तात्पुरत्या निवा:यात पिंज:यात राहात आहेत. या कुत्र्या मांजरांनी जर मी तयार केलेले बो गळ्यात  घातले तर ते खूप आकर्षक दिसतील  आणि मग घेणा:यांना त्यांना घ्यावंसं वाटेल आणि या प्राण्यांना त्यां़चं घर मिळेल. डॅरिअसच्या आईला आपल्या मुलाचा विचार खूप आवडला. ते डॅरिअसनं तयार केलेले बोज घेऊन जवळच्या प्राण्यांच्या निवारा घरात गेले. डॅरिअसनं तेथील लोकांना आपली कल्पना सांगितली. तिथल्या लोकांनीही होकार दिला. डॅरिअसला बो द्वारे जास्तीत जास्त प्राण्यांना मदत करायची होती. तो आठवडय़ातून 10 ते 15 बो टाय बनवू लागला. एक टाय बनवायला, मशीनवर शिवायला त्याला अर्धा तास लागायचा. हे सर्व काम तो वीकेण्डला करत असे. त्यामुळे या कामाचा त्याच्या शाळेच्या  अभ्यासात व्यत्यय येत नसे. डॅरिअसनं तयार केलेल्या बो टायना आजूबाजूच्या प्राण्यांच्या निवारा घरातून मागणी येऊ लागली. मागणीप्रमाणो बो टाय शिवून द्यायचे असतील तर तेवढं कापडही लागणार होतं. ते कापड घेण्यासाठी मदत मिळावी म्हणून त्याच्या आईनं  ‘गो फंड मी’ नावानं अकाऊण्ट उघडून    लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं.  डॅरिअसनं तयार केलेले बो टाय त्याच्या आईनं आणि त्यानं प्रत्यक्षात अमेरिकेतल्या  सात राज्यातील प्राण्याच्या निवारा गृहात स्वत: जाऊन दिले.  डॅरिअसच्या या बो टायचा खरंच उपयोग झाला. त्याच्या या बोय टायमुळे अनेक कुत्रे आणि मांजरांना लोकांनी घेतलं. या प्राण्यांना स्वत:चं घर मिळवून देण्यात डॅरिअसच्या बो टायची खूप मदत झाली. डॅरिअस म्हणतो की मला जास्तीत जास्त बो टाय बनवून खूप प्राण्यांना मदत करायची आहे!मदत करायची असेल तर जवळ पैसेच हवेत असं नाही. डॅरिअससारखी इच्छाशक्ती असली की मदतीचा मार्ग आपोआपच दिसतो.