शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

coronavirus : काय बिघडलं मस्त पिझा, नूडल्स, तवा पुलाव मागवला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 17:42 IST

घरात बसून बसून इतका कंटाळा आलेला असताना मोबाइल अॅप्सवरून चमचमीत काहीतरी खायला मागवलं तर काय बिघडतं?

ठळक मुद्देपिझा-नूडल्स तर काय कधीपण खाता येतील, बाहेरून मागवून .. बरोबर ना?

शहरात राहणा-या अनेक मुलांचा सध्या एकच प्रश्न आहे की, आपल्याला हवे असलेले मस्त मस्त पदार्थ का नाही मागवायचे; पण बाहेरून? त्यात काय आहे, मोबाइल घ्यायचा, एक नेहमीचं अॅप उघडायचं, आणि करायचा ऑर्डर पनीर टिक्का किंवा किंवा पावभाजी किंवा चाट!!! म्हणजे नो उल्लू बनाविंग. घरोघरीच्या आयांना मुलं म्हणतायत, की मुख्यमंत्री काकांनी सांगितलं ते आम्ही ऐकलं आहे की, कफ्र्यू असला तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, मग बाहेरून जेवण मागवणं हे अत्यावश्यक नाही का? काय ते रोज रोज भाजीपोळीच खायची? काय बिघडलं मस्त पिझा, नूडल्स, तवा पुलाव मागवला तर? हॉटेलवाले काका कुठं सुटीवर गेलेत का? घरात बसून बसून इतका कंटाळा आलेला असताना आपल्या आवडीचं चटकमटक मस्त मस्त जेवण हे तर ‘मस्ट’ आहे ना?- हे प्रश्न बरोबरच आहेत. पण अनेकदा प्रश्न बरोबर आणि त्याची उत्तरं तर अगदी सोपी सरळ दिसत असली तरी ती उत्तरं योग्यच असतील आणि आपला ताळा जुळेल असं अजिबात नाही. त्यामुळे बाहेरून का सध्या काही मागवायचं नाही याची ही यादी जरा चेक करून पहा. आणि मग ठरवा तुमचं तुम्हीच.

1. तर मुख्यमंत्री काका म्हणाले की, अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा सुरूराहतील; पण याचा अर्थ असा नाही की पिझा आत्ताच्या आत्ता खाल्ला नाही तर काही प्रॉब्लेम होईल.

2. सध्या आपण सगळेच घरात बंद आहोत. आपल्या घरी जेवायला आहे, आपण जेवतोय ते पुरेसं नाही का?

3. अजून एक महत्त्वाचं म्हणजे अनेक मुलं या संकटकाळात अशीही आहेत की, ज्यांना सकाळी जेवायला मिळालं तर रात्री काय खाणार असा प्रश्न आहे. त्या मुलांना कशी मदत करायची हे आईबाबांशी बोलून ठरवायचं, की आपण पिझा खायचा आग्रह करायचा?4. अॅपवाले काकांचा जरी घरी जेवण आणून देणं हा बिझनेस असला तरी सध्या वाहनांना रस्त्यावर बंदी आहे. असं असताना आपण रस्त्यावरची गर्दी वाढवणार का?5. अॅपवाले, जेवण घरी आणून देणा:या काकांनीपण घरात थांबायला हवं, ते अनेक लोकांना सतत भेटत राहिले तर ते नाही का डेंजर झोनमध्ये येणार?6. मुख्य म्हणजे आपला सगळा समाज संकटात असताना आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवत बाहेरचं खाऊन आजारी पडलो तर कोण रिस्क घेणार?7. त्यापेक्षा बाबाला, आईला स्वयंपाकात मदत करत आपणच घरी स्वयंपाक करून गरमगरम जेवणं सोपं नाही का? 

पिझा-नूडल्स तर काय कधीपण खाता येतील, बाहेरून मागवून .. बरोबर ना?