शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लॉकडाऊन वाढलं ना ? हे घ्या असा शिवा स्वतःचा मास्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:05 IST

मास्क कसा शिवायचा? चला, आज हे शिकूनच घेऊया!

ठळक मुद्देमास्क तर तयार झाला, तो स्वच्छ कसा ठेवायचा ?

- गौरी पटवर्धन

तर आपला मास्क आपण बनवू! आई-बाबांना, घरातल्या सगळ्यांनाच मास्क बनवून देऊ!मास्क बनवण्यासाठी आपल्याला एक तरी जुना टीशर्ट लागेल. कारण मास्क कॉटनचा असला तरी त्याची कानामागे अडकवायची पट्टी मात्र थोडी तरी स्ट्रेचेबल असावी लागते. ती आपण टीशर्ट पासून बनवू शकतो.मास्क कसा बनवायचा?1.  मास्क बनवण्यासाठी आपल्याला कापडाचा आयताकृती तुकडा कापून घ्यायचा आहे.  त्याची लांबीरुंदी ठरवण्यासाठी आपल्याला शिवणाची मेजरींग टेप लागेल. 2. त्या टेपने तुमच्या नाकाच्या वरच्या भागापासून ते हनुवटीच्या खालपयर्ंत किती इंच होतात ते मोजा.3.  जर का तुमच्याकडे शिवणाची टेप नसेल तर एका साध्या दोरीने हे माप घ्या आणि मग ती दोरी नेहेमीच्या फूटपट्टीवर ठेऊन किती इंच होतात ते बघा. 4. या रुंदीत अजून दोन इंच जास्त घ्या. ही झाली आपल्या मास्कची रुंदी.5.  त्यानंतर मास्कची लांबी ठरवण्यासाठी तुमच्या दोन्ही गालांच्या मध्याच्या पुढे टेप येईल असा धरून किती इंच होतात ते बघा. 6. हे माप घेताना टेप नाकाच्या वरून घ्या. या लांबीत अजून एक इंच वाढवा. कानामागे अडकवायची पट्टी शिवण्यासाठी तेवढं कापड जास्त लागणार आहे. ही झाली तुमच्या मास्कची लांबी.

7. आता ज्या कापडाचा मास्क बनवायचा आहे ते कापड टेबलवर किंवा जमिनीवर सपाट करून ठेवा. त्यावरच्या सुरकुत्या सरळ करून घ्या. 8. त्यावर तुमच्या मापाच्या मास्कचा आयत पेन्सिल किंवा खडूने काढा. तुम्ही जर शहाण्या मुलांसारखे त्या मास्कला चारी बाजूंनी नीटनेटकी दुमड घालणार असाल तर तुम्ही घेतलेल्या मापापेक्षा पाऊण इंच लांबी आणि रुंदी जास्त घ्या. कारण तेवढं कापड दुमड घालण्यात जाणार आहे.9. तुम्ही जर साडी किंवा ओढणीसारख्या पातळ कपड्याचा मास्क बनवणार असलात तर त्या कपड्याच्या चार घड्या घ्या. टीशर्ट किंवा रुमालाचा दोन घड्या पुरतील.10. आता हे कापड तसंच ठेऊन चांगल्या धारेच्या कात्रीने तो आयत कापून घ्या. त्याला चारही बाजूंनी दुमड घालून हातशिलाई करा. 11. मग टीशर्टच्या कापडाची पट्टी कापून घ्या. त्या पट्टीला दुमड घालून शिवून घ्या.म्हणजे त्याचे दोरे निघणार नाहीत. 12. मग या पट्टीचे दोन भाग करा. दोन्ही भाग मास्कचा रुंदीच्या बाजूला शिवून टाका. 13. आता या मास्कला रुंदीमध्ये तीन-चार प्लेट्स घाला. म्हणजे तो मास्क नाकावर घातल्यावर त्याने नाक चेपलं जाणार नाही. 14. एकदा तो मास्क चेहे?्यावर लावून बघा. आणि मग त्याच्या पट्टीची लांबी जेवढी पाहिजे आहे तिथे तिला गाठ मारून टाका. तुमचा मास्क तयार आहे.घरातल्या मोठ्या माणसांसाठी मास्क बनवतांना या मापापेक्षा लांबी आणि रुंदी एक एक इंच जास्त घ्या. कारण मोठ्या माणसांचा चेहेरा मोठा असतो.

- आता मास्क तर तयार झाला, तो स्वच्छ कसा ठेवायचा ते शिकूया उद्या!!