बघता बघता 2020 अर्धा भाग त्या कोरोनाने खाल्ला. सुरुवातीला कोणालाच काही कळत नव्हतं, सगळ्या बाजूंनी नुसत्या अफवा उठत होत्या. लॉकडाऊन फार सिरीयस होता. कोणीच कुठे जाऊ शकत नव्हतं. मोठ्या माणसांना या प्रकारचं सॉलिड टेन्शन आलं होतं आणि ते टेन्शन कळत - नकळत लहान मुलांपयर्ंत आपोआप पोचत होतं. त्यामुळे मार्चपासूनचा बराचसा काळ काय करायचं आणि काय नाही करायचं याचं गणित सोडवण्यातच गेला. त्यामुळे धावपळ झाली, काहीही प्लॅनिंग करता आलं नाही आणि बराचसा वेळ वाया गेला अशी भावना अनेकांच्या मनात आहे. पण त्यावेळी त्याला काही इलाजही नव्हता.पण आता परिस्थिती बदलली आहे. हळूहळू उद्योग सुरु होतायत. हा कोरोना नेमका काय आहे, त्याने किती नुकसान होऊ शकतं, आपल्याला त्याचा त्रस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचा बराच अंदाज आता आपल्याला आलेला आहे. आणि त्यात एक गोष्ट सगळे पुन्हा पुन्हा सांगतायत ती म्हणजे कोरोना काही एवढ्यात जाणार नाही. मग आपण काय करायचं? नुसतं बसून राहायचं का?तर आपण असे नुसते बसून राहणारे लोक आहोत का? नाही ना? मग याही वेळी आपण बसून राहायचं नाही, तर आहे त्या परिस्थितीत आपण त्यातल्या त्यात काय करू शकतो ते करायचं.
2020 - वर्षाच्या उरलेल्या निम्म्या भागात काय काय करणार तुम्ही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:19 IST
कोरोना काही एवढ्यात जाणार नाही. मग आपण काय करायचं? नुसतं बसून राहायचं का?
2020 - वर्षाच्या उरलेल्या निम्म्या भागात काय काय करणार तुम्ही?
ठळक मुद्देउरलेल्या 2020 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याची यादी करा.