शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

स्वत:ला शोधणारा प्रवास कुठे आणि कधी करणार?

By admin | Updated: April 5, 2017 17:53 IST

हल्ली चित्रपट पाहतानाही एखाद्या ठिकाणची मस्त सफर केल्यासारखं वाटतं. बऱ्याच चित्रपटात नायक नायिकांना प्रवास करता करता स्वत:चा शोध लागतो. तसाच आपल्या स्वत:चा शोध लागावा

हल्ली चित्रपट पाहतानाही एखाद्या ठिकाणची मस्त सफर केल्यासारखं वाटतं. बऱ्याच चित्रपटात नायक नायिकांना प्रवास करता करता स्वत:चा शोध लागतो. तसाच आपल्या स्वत:चा शोध लागावा असा प्रवास आपण आपल्या आयुष्यात कधी आणि कुठे करणार? माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे इम्तियाज अली. सिनेमॅटिक इलिमेंट्ससाठी त्याचा सिनेमा आवडतोच. पण त्यातली अजून एक गोष्ट खूप अपील करु न जाते...प्रवास! जब वी मेट असो, हायवे, रॉकस्टार किंवा तमाशा त्याच्या चित्रपटांमध्ये कथानकाचा एक महत्त्वाचा भाग बनून आलेला प्रवास आणि याच प्रवासातून व्यक्तिरेखांना गवसत गेलेलं स्वत:चं अस्तित्त्व. बरं त्यासाठी तो काही वेगळा खटाटोप करत नाही. सहजपणे त्याच्या चित्रपटात अशी काही ठिकाणं येतात की ती बघून आपल्याही मनात उठून प्रवासाला जाण्याचा विचार यावाच. ‘हायवे’मध्ये चांदण्या रात्री कच्छच्या पांढऱ्या शुभ्र रणामध्ये स्तिमित होऊन बसलेली आलिया; ‘ऐसी भी जगह होती है दुनिया में म्हणणारी’. त्याक्षणी माझ्याही मनात हीच भावना आलेली. तेव्हाच ठरवलं होतं एकदा तरी कच्छला भेट द्यायची. गुजरात टुरिझमच्या रणोत्सवाच्या जाहिराती पाहून जे झालं नाही ते काम त्या एका अप्रतिम शॉटनं केलं. इम्तियाज अलीचे चित्रपट बघताना सौंदर्याचा अनुभव तर येतोच पण त्याचबरोबर माझ्या बाबतीत अजून एक गोष्ट झाली आहे. जिथे फिरायला जावंसं वाटतंय अशा ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सची यादीही तयार होतीये. याच यादीतलं अजून एक ठिकाण म्हणजे अरु व्हॅली.हायवेमध्ये शेवटी पहायला मिळालेलं छोटंस गावं. पहलगामपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं. जिथं जाऊन रोज उठून काही पाहण्याची गडबड नसेल...आपण निवांत असू अगदी मैं और मेरी तनहाई टाइप. इथे कोणालाही जायला आवडेल. प्रवासाचा विषय आहे म्हटल्यावर जब वी मेटचा उल्लेख आलाच पाहिजे. ट्रेनच्या डब्यातून सुरु झालेला प्रवास रतलाम की गलीमधून राजस्थानातल्या खेड्यांतून भटिंडापर्यंत जाऊन पोहचतो. आणि हो तिथून पुढे मनाली-शिमल्यालाही घेऊन जातो. या चित्रपटातील एका गाण्यात ‘रोहतांग पास’चं दर्शन घडतं. तेव्हा या रस्त्यावरु न प्रवास करु न मनाली-कुलुला जाण्याचा विचार एकदा तरी मनात येतोच. ज्यांना साहसाची आवड आहे त्यांच्या मनात तर जास्तच. कारण हा जगातला सर्वांत उंचावरचा मोटरेबल रोड आहे. काश्मीरमधलंच असंच एक सुंदर, बॉलिवूडने अजून फारसं एक्सप्लोअर न केलेलं लोकेशन म्हणजे बेताब व्हॅली. रॉकस्टार पाहिलेल्यांना चटकन लक्षात येईल. देवदार आणि पाईनची वनराई आणि त्यातून डोकावणारी बर्फाच्छादित शिखरं. पहलगामपासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणाचं चित्रपटातलं दर्शन अमृता सिंग आणि सनी देओलच्या ‘बेताब’ मधूनच झालेलं. या व्हॅलीचं नावपण बेताबवरुनच पडलं आहे. पण त्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्ध केलं. इम्तियाजनं. तमाशा अजून पाहिला नाही. पण कोर्सिका नावाचं ठिकाण जगाच्या पाठीवर आहे, हे तरी कळलं. त्यामुळे बाकी कशासाठी नाही, तरी इम्तियाज अली स्टाइलमध्ये कोर्सिकाचं दर्शन घेण्यासाठी मात्र नक्की हा चित्रपट पहायचा आहे. परदेशातलं असंच अजून एक ठिकाण म्हणजे प्राग. चेक प्रजासत्ताकची राजधानी. युरोपमधली चार ठिकाणं ही कायम माझ्या आकर्षणाचा विषय आहेत...लंडन, पॅरिस, व्हिएन्ना आणि व्हेनिस. का हे माहित नाही. पण या चारही ठिकाणांना भेट देण्याचं स्वप्न आहे. त्यात आता पाचवं ठिकाण जोडलं गेलंय...प्राग. गार्डन्स, कारंजी, छोटे छोटे कॅफे, चॅपेल्स आणि सुंदर वास्तू. जाऊन आलंच पाहिजे ना!सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे चित्रपट सुंदर ठिकाणांची प्रवास यात्राच घडवत नाही तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देतात. म्हणूनच ‘मंजीलसे भी बेहतर लगने लगे है ये रास्ते’ म्हणत आज, आता या क्षणामध्ये आयुष्य समरसून जगायला सांगतात. कदाचित इम्तियाज अलीचा स्वत:चा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोनही याला कारणीभूत असेल. एका मुलाखतीत इम्तियाजनं ‘माझ्या फिल्म या माझ्या ट्रॅव्हल डायरी आहेत, असं म्हटलं होतं. एखाद्या ठिकाणाबद्दल मी जे अनुभवलेलं असतं, ते मी फिल्ममधूनही व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. शिवाय फिरणं ही माझ्या दृष्टिनं अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला स्वत:चा शोध घ्यायला मदत करते, तुमच्यातलीच एखादी नवीन गोष्ट तुमच्या समोर येते.’प्रवासातली, फिरण्यामधली गंमत यापेक्षा जास्त चांगल्या शब्दांत कदाचित नाही मांडता येणार!