शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

निसर्गरम्य असलं तरीही तुवालूला पर्यटकांची गर्दी नसते. आॅफबीट ठिकाणाच्या शोधात असाल तर तुवालूला जायलाच हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:47 IST

फिजीपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तुवालू आहे. पण फिजीला भेट देणा-या पर्यटकांच्या तुलनेत तुवालूला भेट देणा-या पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं तर 2016 सालातलं ‘लीस्ट व्हिजिटेड डेस्टिनेशन’ म्हणून तुवालूचा उल्लेख केला आहे.

ठळक मुद्दे* फिजीपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तुवालू आहे. पण फिजीला भेट देणा-यापर्यटकांच्या तुलनेत तुवालूला भेट देणा-या पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं तर 2016 सालातलं ‘लीस्ट व्हिजिटेड डेस्टिनेशन’ म्हणून त* तुवालू हा तीन प्रवाळ बेटांनी आणि सहा कंकणद्वीपांनी बनलेला आहे. यातल्या प्रत्येक बेटाचं स्वत:चं असं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला इथे काही ना काही खास गोष्टी पहायला मिळतातच.* या देशात एका बाजूला तुम्हाला पामच्या झाडांचा उपयोग करु न बनवलेली खोपटासारखी घरं दिसतील. तर दुस-या बाजूला युरोपियन पद्धतीच्या इमारती.* तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल, मित्र-मंडळींबरोबर फिरायला जाणार असाल, एकदम आॅफ बीट ठिकाणाच्या शोधत असाल तर नक्की तुवालूचा आॅप्शन ट्राय करून पहायला हरकत नाही.

- अमृता कदमअमूक या देशाला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे, तुम्हाला इथे निवांतपणा मिळेल, एक वेगळी संस्कृती अनुभवायला मिळेल, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतील...हे वाचल्यावर तुम्हाला इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असेल, आपल्याला बुकिंग कसं मिळेल असे प्रश्न पडतील. मात्र ही काळजी सोडून द्या. कारण एवढं सगळं असलेल्या या देशाला सर्वांत कमी पर्यटक भेट देतात. दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला हा चिमकुला देश आहे तुवालू. हवाई बेटं आणि आॅस्ट्रेलियाच्या मधोमध तुवालू आहे. अजून जास्त नेमकेपणानं सांगायचं तर फिजीचा हा शेजारी. फिजीपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तुवालू आहे. पण फिजीला भेट                   देणा-या पर्यटकांच्या तुलनेत तुवालूला भेट देणा-या पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं तर 2016 सालातलं ‘लीस्ट व्हिजिटेड डेस्टिनेशन’ म्हणून तुवालूचा उल्लेख केला आहे.या अहवालानुसार 2016 मध्ये या देशाला भेट देणा-या पर्यटकांची संख्या होती अवघी दोन हजार. अर्थात 2014 शी तुलना करता हा आकडा जास्तीच होता. 2014 साली या देशाला हजार पर्यटकांनीच भेट दिली होती. नीलमण्यासारखा समुद्र, पांढ-या शुभ्र रेतीचे समुद्रकिनारे, सुंदर प्रवाळं, किना-यावरची पाम वृक्षांची रांग...अशाच शांत आणि आॅफबीट ठिकाणं शोधण्याचा पर्यटकांचा कल वाढत असताना तुवालूला अजूनही पर्यटकांच्या विश लिस्टमध्ये आपली जागा का निर्माण करता आली नाहीये? हे एक कोडंच आहे.इतरांनी जरी तुवालूकडे पाठ फिरवली असली तरी तुम्ही मात्र या ठिकाणाचा विचार जरु र करु शकता.तुवालूला आहे काय?

 

1. थक्क करणारं निसर्गसौंदर्यतुवालू हा तीन प्रवाळ बेटांनी आणि सहा कंकणद्वीपांनी बनलेला आहे. यातल्या प्रत्येक बेटाचं स्वत:चं असं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला इथे काही ना काही खास गोष्टी पहायला मिळतातच. या सहा बेटांपैकी एक मुख्य कंकणबेटं म्हणजे तुवालूची राजधानी फुनफुटी. फुनफुटीची खासियत म्हणजे जगातला एकमेव कोणतीही कुंपणं नसलेला विमानतळ. समुद्रात घुसलेल्या या विमानतळाच्या पट्टीला पामच्या झाडांनी वेढलं आहे. फुनफुटीचा हा आगळावेगळा विमानतळ तुवालूमध्ये काय नजारे पहायला मिळतील याची झलकच दाखवतो.2. समृद्ध परंपरा आणि संस्कृतीसोळाव्या शतकात ब्रिटीशांच्या आगमनानंतर हा बेटांचा छोटासा देश जगाच्या नकाशावर आला. एकोणिसाव्या शतकात तुवालू ब्रिटीश वसाहतीचा भाग बनला. पण इथले मूळ रहिवाशी म्हणजे पोलिनेशियन्स. अजूनही व्यावसायिकतेचा स्पर्श झाला नसल्यामुळे असेल कदाचित पण या जमातीनं आपल्या परंपरा आणि संस्कृती जतन करु न ठेवल्या आहेत. इथल्या लोकांची जीवनपद्धती पर्यटकांना फार जवळून पाहता येते. त्यांची घरं, फाटेल नावानं ओळखला जाणारी त्यांची गाणी आणि नृत्यं सर्वं काही अनुभवता येतं.इथल्या बायकांनी आपली पारंपरिक हस्तकलाही जपली आहे. 

 

3. स्थापत्यया देशात एका बाजूला तुम्हाला पामच्या झाडांचा उपयोग करु न बनवलेली खोपटासारखी घरं दिसतील. तर    दुस-या बाजूला युरोपियन पद्धतीच्या इमारती. खरंतर इथले लोक घरं बांधण्यासाठी सिमेंट-कॉंक्रि टचा अजिबात वापर करत नाहीत. ही गोष्ट त्यांना युरोपियन लोकांनी शिकवली. पण अजूनही बरेच लोक परंपरागत पद्धतीच्या घरातच राहणं पसंत करतात.4. चवदार खाद्यपदार्थतुवालूच्या लोकांच्या आहारातला मुख्य घटक आहे नारळ आणि मासे. इथल्या खास पदार्थांमध्ये नारळ, ब्रेडफूट आणि केळ्यांचा वापर करुन बनवलेला ‘पुलाका’ हा पदार्थ विशेष आहे.तुवालूला जाणं कठीण असेल, राहण्याच्या सोयी नीट नसतील असे विचार मनात येत असतील तर ते काढून टाका. हा देश काही दुर्गम नाही. तुम्ही फिजीला जाऊन तिथून पुढे तुवालूला जाऊ शकता. किंवा एअर पॅसिफिकची या बेटासाठी खास विमानसेवाही आहे. हां, हे शोधण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडे कष्ट घ्यावे लागतील. इथे राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आणि गेस्टहाऊसही आहेत. इंग्लिश हीच आता इथली अधिकृत भाषा झाल्यानं संवाद साधण्यातही अडचणी येत नाही.तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल, मित्र-मंडळींबरोबर फिरायला जाणार असाल, एकदम आॅफ बीट ठिकाणाच्या शोधत असाल तर नक्की तुवालूचा आॅप्शन ट्राय करून पहायला हरकत नाही. जिथं सगळ्यांची गर्दी होते, ते ठिकाण सुंदर असलंच पाहिजे असं नाही. त्यामुळे पर्यटनातली रूळलेल्या ठिकाणांना काट मारु न तुवालूची सफर करून तर या!