शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक आणि भव्य ठिकाणांसाठी ओळखलं जातं कर्नाटकातील 'बादामी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 19:05 IST

तुम्हाला जर ऐतिहासिक आणि भव्य अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर तुम्ही कर्नाटकातील बादामी गुहांना नक्की भेट द्या.

तुम्हाला जर ऐतिहासिक आणि भव्य अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर तुम्ही कर्नाटकातील बादामी गुहांना नक्की भेट द्या. या गुहा आणि येथील शिल्प तुम्हाला थेट इसवीसन 500 शतकांमध्ये घेऊन जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या नैसर्गिक गुहा नसून मोठे मोठे डोंगर पोखरून तयार करण्यात आलेल्या गुहा आहेत. त्याकाळात तयार करण्यात आलेल्या या भव्य गुहा पाहून फार कुतुहल वाटतं. कारण एवढ्या पुरातन काळातही निर्माण केलेली ही सुंदर गुहा भल्या भल्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेल्या भव्य दिव्य वास्तूकलांनाही मागे टाकते. अनेक देशो-विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात. 

कर्नाटक राज्यातील बगलकोट जिल्ह्यामध्ये स्थित आहे या बदामी नावाचं ठिकाण आणि येथेच आहेत जगभरात प्रसिद्ध असलेल्या बादामी गुहा... येथे या गुहांव्यतिरिक्त अनेक भव्य ऐतिहासिक स्थळं पाहता येतील. यामुळे बादामी जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करणारं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे. जर तुम्हाला हिल स्टेशन्स किंवा किल्ले आणि महालांपेक्षा वेगळं काहीतरी पाहायचं असेल आणि अनुभवायचं असेल तर कर्नाटकच्या बगलकोटमधील बदामी गुहांना नक्की भेट द्या. येथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तूंसोबतच नैसर्गिक सौंदर्यही अनुभवणं शक्य होईल. 

(Image Credit : gops.org)

येथे मालाप्रभा नदीजवळच भगवान शंकराला समर्पित असलेलं  भूतनाथ मंदिर आहे. बदामीमध्ये इसवीसन 500 ते 700 दरम्यान बांधण्यात आलेला एक भव्य किल्लादेखील आहे.  हा किल्ला बदामी किल्ल्याच्या नावानेही ओळखला जातो. या किल्याच्या भिंतींवर आणि छतावर करण्यात आलेलं नक्षीकाम पाहून तुम्ही त्या वास्तूच्या प्रेमात पडाल. या वास्तूशिल्पांमध्ये तुम्हाला द्राविडी स्थापत्य शैलीचा प्रभाव पाहता येईल. 

असं पोहोचाल बदामीला...

कर्नाटकमध्ये स्थित असलेल्या बदामी येथे तुम्ही रेल्वे मार्गाने, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गाने जाऊ शकता. जर तुम्ही कमी वेळामुळे प्लाइटने बदामीला जाणार असाल तर तुम्ही हुबळी विमानतळावरून जाऊ शकता. हुबळीपासून बदामीपर्यंत तुम्हाला जवळपास 1 ते 6 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. 

जर तुम्हाला रेल्वे मार्गाने बदामीला जाणार असाल तर तुम्हाला देशातील कोणत्याही मोठ्या शहरातून कनेक्टिविटी मिळू शकेल. बादामी रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही रेल्वे मार्गाने येथे पोहोचू शकाल. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन