शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर जंगलांचं सुंदर ठिकाण नेतरहाट, शांत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:30 IST

झारखंडचा हा परिसर आदिवासी बहुल आहे आणि जास्तीत जास्त परिसरात जंगल पसरलेलं आहे.

जंगलात फिरण्याची आणि निसर्गाचा वेगळाच आनंद घेण्याची तुम्हाला आवड असेल आणि फिरायला जाण्यासाठी अशा ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत. हिवाळ्यात नेतरहाट इथे तुम्ही जाऊन कधीही न अनुभवलेला आनंद घेऊ शकता.  

नेतरहाटचा अर्थ

झारखंडचा हा परिसर आदिवासी बहुल आहे आणि जास्तीत जास्त परिसरात जंगल पसरलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची उंचच उंच झाडे आहेत. येथील स्थानिक भाषेत नेतरहाटचा अर्थ बांस का बाजार म्हणजेच बांबूचा बाजार असा होतो. इथे हिंदी आणि संथाली भाषा बोलली जाते. हे ठिकाण उन्हाळ्यात हैराण झालेल्या इंग्रजांनी शोधून काढलं होतं. फिरण्यासाठी इथे अनेक ठिकाणे आहेत. 

सूर्योदय आणि सूर्यास्त

या डोंगराळ भागातील सर्वात मोठं आकर्षण येथील सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. तसे तर ही दृश्ये येथे कुठूनही पाहिली जाऊ शकतात. पण येथे हे पाहण्यासाठी काही खास स्पॉट्स आहेत. टूरिस्ट बंगला, हॉटेल प्रभात विहार इथे लोक गर्दी करतात. 

अप्पर घाघरी फॉल

येथून ४ किमी अंतरावर अप्पर घाघरी फॉल आहे. डोंगराला चिरून येणारं पाणी पाहण्यात इथे वेगळीच मजा येते. हा धबधबा भलेही लहान असेल पण फारच सुंदर आहे. पर्यटक इथे आल्यावर लोअर आणि अप्पर घाघरी फॉल बघायला आवर्जून जातात. इथे पोहोचण्याचा रस्ता हा गावातून जातो आणि पक्का रस्ताही नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांची मदत घेऊन इथे पोहोचता येतं. पण इथे इंटरनेट अजिबात चालत नाही.  

लोअर घाघरी फॉल

लोअर घाघरी फॉलमधून ३२० फूट उंचीवरुन पाणी खाली पडतं. या धबधब्याजवळ सुंदर निसर्ग आहे. या धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा येते.  

मॅग्नोलिया सनसेट पॉईंट

नेतरहाटपासून साधारण १० किमी अंतरावर मॅग्नोलिया पॉईंट आहे. या सुंदर जागेसोबत एक प्रेम कथाही जुळलेली आहे.  अशी प्रेमकहाणी जिथे प्रेमी युगुलाच्या जीवनाचा सूर्यास्त होतो. एका इंग्रज अधिकाऱ्याची मुलगी मॅग्नोलियाला एका गरीब मुलाशी प्रेम होतं. दोघांचं प्रेम चांगलंच बहरलेलं असतं, पण त्यांना सामाजिक मान्यता मिळत नाही. अशात त्या मुलाची हत्या होते. त्यानंतर मॅग्नोलियाही दरीत उडी घेत आपला जीव देते. ही कहाणी इथे मूर्तींच्या रुपात सांगण्यात आली आहे. 

कधी जाल?

इथलं वातावरण नेहमीच चांगलं राहतं आणि इथे पाऊसही भरपूर होतो. येथील डोंगर फार जुने आहे त्यामुळे इथे भूस्खलनाची भीती नसते. वर्षातल्या कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही इथे जाण्याचा प्लॅन करु शकता. 

कसे जाल?

रेल्वे आणि हवाई मार्गाने रांची सगळीकडे जोडलं गेलं आहे. त्यामुळे रेल्वेने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. रांचीला पोहोचल्यावर तुम्ही रस्ते मार्गे १५० किमीचं अंतर पार करुन नेतरहाटला पोहोचू शकता.  

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन