शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जगातले 4 सर्वात रोमांचक टूरिस्ट स्पॉट, इथे जाण्यासाठी करावी लागते मोठी हिंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 11:52 IST

आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही टुरिस्ट स्पॉटबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणे मोठी रिस्क घेण्यासारखेच आहे. पण तरीही जगभरातील पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.  

जगभरातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची आवड असते. कुणाला रोमॅंटिक जागेवर पसंत असतं तर कुणाला धार्मिक स्थळांना जाणं आवडतं. काही लोकांना अशा ठिकाणी जाणं जिथे त्यांना रोमांचक काहीतरी करायला मिळेल. रोमांचक प्रवास करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही टूरिस्ट स्पॉटबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणं मोठी रिस्क घेण्यासारखेच मानले जाते. पण तरीही जगभरातील पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.  

1) जेन एन टॉवर युनशान, चीन

चीन हा देश आपल्या इतिहासासाठी आणि सुंदरतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील वेगवेगळी ठिकाणे नेहमीच प्रेक्षकांचं आकर्षण राहिली आहेत. पण त्यात एक खास ठिकाण सध्या चांगलंच गाजतंय. इथे चाय पिंग शहराच्या डोंगरावर असलेलं एक घर पर्यटकांचं फारच लक्ष वेधून घेत आहे. या घराच्या आजूबाजूचा सुंदर निसर्गही अनेकांना प्रेमात पाडतोय. रोमांचक गोष्ट म्हणजे या घराजवळ जाण्यासाठी हजारों पायऱ्या चढून जाव्या लागतात. 

2) इटली, पोन्टे वेकियो

इटलीच्या फिरेन्डे शहरातील पोन्टे वेकियो नदीवर असलेला हा पुल 1345 वर्ष जुना आहे. या पुलावर असलेली दुकाने आणि घरे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. यावर ज्याप्रकारे घरे बांधण्यात आली आहेत ते पाहून कुणालाही आश्चर्यच होतं. 

3) हॅगिंग मॉनेस्ट्री, चीन

शांझीमध्ये असलेला हेंग माउंटेन चीनमधील सर्वात धोकादायक डोंगरांपैकी एक आहे. या उंच डोंगरांच्या कडेला लोकांनी घरे बांधली आहेत. ही घरे पाहिल्यावर ती हवेत झुलत असल्यासारखी वाटतात. ही घरे आणि डोंगर पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. 

4) अलहजारा, यमन

यमन आपल्या उंचच उंच डोंगरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यातील एक डोंगरावर एक सुंदर शहर वसवलं आहे. या शहराला अलहजारा असे म्हटले जाते. हे शहर 12व्या शतकात तयार करण्यात आलं होतं. डोंगरांना पोखरुन हे शहर वसवण्यात आलंय.

टॅग्स :Travelप्रवासJara hatkeजरा हटकेtourismपर्यटनchinaचीनItalyइटली