शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

केवळ चार माणसाचं शहर.. पाहायचंय का तुम्हाला? मग कॅनडाला चला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:32 IST

अतिशय निवांत जागी जाण्यासाठी एक ठिकाण आहे. हे असं शहर आहे जिथे केवळ चारच लोक राहातात.हे ठिकाण पाहायचं असेल, इथली शांतता अनुभवायची असेल तर फक्त कॅनडाला जावं लागेल इतकंच. कारण हे ठिकाण कॅनडात आहे.

ठळक मुद्दे* कॅनडामधलं टिल्ट कोव या शहरात पोस्ट आॅफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही या ठिकाणी आहे. पण तरीही या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात.* डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते.* नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा इथे फिरण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ. याच काळात इथलं हवामान फिरण्यासाठी सर्वांत योग्य असतं.

-अमृता कदम 

गावाकडून शहराकडे हा सध्याच्या धावपळीच्या जीवनाचा प्रवाह बनलाय. शहरांमध्ये रोजगाराच्या, पोटापाण्याच्या अनेक संधी असल्या तरी जगण्यासाठीची शांती मात्र सापडत नाही. त्यामुळेच शहरातले लोक या मानसिक शांतीच्या शोधात हिल स्टेशन किंवा छोट्याशा गावांकडे सुट्टीसाठी वळतात. अनेकदा आपल्या फिरण्यामागचं कारण असा निवांतपणा मिळावा हेच असतं. तुम्हीपण अशा निवांतपणाच्या शोधात असाल तर एका अतिशय भन्नाट ठिकाणाची ओळख तुम्ही करून घ्यायलाच हवी...एक अशी जागा ज्या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण असं ठिकाण खरंच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे.

 

कॅनडामधलं टिल्ट कोव

या भन्नाट शहराचं नाव आहे टिल्ट कोव. पोस्ट आॅफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही या ठिकाणी आहे. पण तरीही या ठिकाणी केवळ चारच लोक राहतात. या चौघांचं राहाण्याचं कारणही काय, तर यांना या जागेची देखभाल करावी लागते. असं सांगतात की एकेकाळी हे शहर गजबजलेलं होतं, अनेक लोक इथे राहातही होते. पण 1967 मध्ये जेव्हा इथल्या खाणउद्योगावर संकट कोसळलं तेव्हा मात्र या शहराची स्थिती बदलली. शहर सोडून लोक दुस-या शहराच्या शोधात निघाले आणि टिल्ट कोव ओस पडू लागलं. तेव्हापासून या जागेच्या नशिबी केवळ एकांतवासच आहे. अर्थात कुठल्याही संकटात एक संधी लपलेली असते असं म्हणतात. या शहराच्या बाबतीतही तसंच झालं. कारण हे सुनंसुनं शहर पहायलाही लोकांची गर्दी होऊ लागलीये. लोक नसले तरी शहराची भौतिक रचना मात्र जशीच्या तशी राहिली आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी या सुन्यासुन्या शहरालाही दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.इथलं आकर्षण

डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या पर्वतराजी आणि त्यासोबत तितकेच सुंदर तलाव आणि झरे. इथे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचा आनंद लुटण्यासाठीही अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

 

कसे पोहचाल

कॅनडाला पोहचण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइटस उपलब्ध आहेत. कॅनडाच्या राजधानी टोरांटोपासून टॅक्सीनं अगदी दोन ते तीन तासांच्या अंतरावरच हे शहर आहे.फिरण्यासाठी उत्तम काळनोव्हेंबर ते फेब्रुवारी हा इथे फिरण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ. याच काळात इथलं हवामान फिरण्यासाठी सर्वांत योग्य असतं.अर्थात, केवळ हे एकमेव शहर पाहण्यासाठी कॅनडाचं तिकीट काढणं परवडणारं नाही. पण जर कुठल्या निमित्तानं कॅनडामध्ये गेलाच तर मात्र हे अनोखं शहर पाहायला विसरु नका. ते तुम्हाला भूतकाळाच्या आठवणींमध्ये नक्की घेऊन जाईल.