शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

‘ट्रॅव्हल पॅकेज’ घेताय?- जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 8:29 AM

जाहिराती पाहून तुम्हीही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सखोल माहिती घेणं गरजेचं आहे. 

वर्षाअखेर सुटीदरम्यान कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचे नियोजन करत असाल, तर जरा जपून. आकर्षक टूर पॅकेज देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. रोजच्या धावपळीतून काही क्षण निवांत घालवण्याच्या उद्देशाने लोक पर्यटनस्थळांना पसंती देतात. या काळात ट्रॅव्हल कंपन्यांकडून ट्रॅव्हल पॅकेजविषयी  जाहिराती केल्या जातात. अशा जाहिराती पाहून तुम्हीही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सखोल माहिती घेणं गरजेचं आहे. 

१. पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, कोणत्या गोष्टींसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार हे पाहावं. २. पॅकेज अंतर्गत कोणती पर्यटनस्थळं दाखवली जाणार, त्या ठिकाणची प्रवेश फी वेगळी द्यायची का ती पॅकेजमध्ये समाविष्ट आहे, याची माहिती घ्यावी. पॅकेजमध्ये विमान प्रवास समाविष्ट असेल तर विमान थेट आहे की, कनेक्टिंग आहे ते पहावे.  

विमानाचं तिकीट हे ‘ई-तिकीट’ स्वरूपात असतं. त्यामुळे अनेकदा ट्रॅव्हल एजंट पर्यटकांना फसवण्यासाठी जुनं एखादं तिकीट तारीख बदलून देतात. म्हणून पर्यटकांनी ‘ई-तिकीट’ हातात मिळाल्यावर त्यावरील पीएनआर नंबरच्या मदतीनं प्रत्यक्षात आपलं तिकीट बुक झालं आहे का याची माहिती वेबसाइटवरून करून घ्यावी. ४. बुकिंग करताना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल कंपनीकडूनच तुमच्या सहलीचं बुकिंग करा. ती ट्रॅव्हल कंपनी किंवा ट्रॅव्हल एजंट पर्यटन क्षेत्रात किती वर्षे कार्यरत आहे, तसंच त्याची विश्वासार्हता किती आहे, याविषयी चौकशी करायला हवी. 

एकूणच पर्यटनाचं नियोजन करताना ट्रॅव्हल कंपनीशी निगडीत सर्व गोष्टींची स्पष्टता झाल्याशिवाय ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्याची चूक करू नका. यामुळे तुमचा त्रास टळेल आणि पर्यटनाचा आनंद मिळवता येईल. तरीही फसवणूक झाल्यास ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, स्थानिक पोलिस स्टेशन तसेच ग्राहक मंच आहेतच. नियोजित सहल रद्द करून भरलेले पैसे देण्यास एखादी ट्रॅव्हल कंपनी चालढकल करत असल्यास  ग्राहक त्या विरोधात ग्राहक मंचात दाद मागू शकतात.- विक्रम ब्रह्माजी गावडे,           भांडुप (प.), मुंबई

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स