शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

‘कोकण कॉन्क्लेव्ह’ ची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 13:18 IST

कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत. कोकणातील पर्यटन, अन्न आणि अन्न प्रक्रीया उद्योगांना जागतिक व्यापार पटलावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत. कोकणातील पर्यटन, अन्न आणि अन्न प्रक्रीया उद्योगांना जागतिक व्यापार पटलावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील ५०० उद्योजक यात सहभागी होणार आहेत. रविवार २० मे रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.कोकणचे सौंदर्य केरळ पेक्षा तसूभरही कमी नाही. परंतु केरळच्या तुलनेत कोकणात येणा-या पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे. ही परीस्थिती बदलण्यासाठी जगातील ५० देशांतील उद्योजकांना ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ च्या निमित्ताने मुंबईत आणण्यात येणार आहे. सहारा स्टार हॉटेलमध्ये होणा-या दोन दिवसांच्या कार्यक्रमात हे उद्योजक विविध विषयांवर आयोजित परीसंवादात सहभागी होतील, तसेच परदेशातून येणा-या उद्योजकांसोबत, भारतातून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत व्यावसायिक चर्चाही करतील. २१ मे रोजी कोकणातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. प्रेम जग्यासि यांच्या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोन्स, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, बंदरे-नौकानयन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अतुल भातखळकर, आमदार अमित साटम, ‘मसाला किंग’ धनंजय दातार आणि विविध विषयांचे तज्ज्ञ या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.परदेशी उद्योजकांचा कोकण दौरादुस-या दिवशी वर्कशॉपनंतर परदेशातून आलेले उद्योजक २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर जाणार आहेत. या भेटीत परदेशी पाहूणे कोकणातील काही देखणे समुद्र किनारे, बॅक वॉटर, मंदीरे, गड किल्ल्यांची सफर करून कोकणाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणार आहेत. चिपळूण येथील बॅक वॉटर, गणपतीपुळे, थिबा पॅलेस, विजयदुर्गचा किल्ला, कुणकेश्वर मंदीर अशा पर्यटन स्थळांना भेट अपेक्षित आहे. काही काजू कारखाने, आमरस कारखाने आणि अन्य काही प्रकल्पांना भेट देण्यात येणार आहे. २४ मे रोजी परदेशी पाहूणे आपआपल्या देशात रवाना होणार आहेत. रीव्हर्स एण्ड माऊंटसने या उपक्रमाचे आयोजन केले असून कोकणातील अनेक सामाजिक संस्थांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. परदेशातील पर्यटन क्षेत्रातील दिग्गजांनी कोकणच्या पर्यटनस्थळांना भेट दिल्यामुळे या क्षेत्रातील पर्य़टनाला उत्तम चालना मिळार असून अन्न प्रक्रीया उद्योगातील लोकांनाही जागतिक पातळीवरील उद्योगांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक दिनेश कानजी आणि समीर गुरव यांनी दिली.