शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

 परदेशात फिरण्यासाठी चांगली संधी हवीये? तर वाट कसली पाहताय पटापट बुक करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 17:21 IST

भरपूर लोकांना फिरण्याची खूप आवड असते

भरपूर लोकांना फिरण्याची खूप आवड असते. तुम्हाला  सुद्धा जर या वर्षी थंडिचा आनंद घेण्यासाठी फिरायला जावसं वाटत असेल तर  तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  भटकंती करण्याची आवड असलेल्या नागरिकांसाठी एक चांगली संधी आहे. जगातल्या सगळ्यात उंच इमारती आणि बुर्ज खलिफा पासून क्रुजची सफर करण्याची मजाच काही वेगळी आहे.  पण परदेशी जाताना होणारा खर्च पाहून आपण ठरवण्याच्या आधी खूप विचार करत असतो. पण जर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर दुबईला फिरायला जाण्यासाठी जास्त खर्च येत नाही. 

भारतीय रेल्वेने म्हणजेच आईआरसीटीसीने परदेशातील यात्रेसाठी एक खास टूर पॅकेज आणलं आहे. कारण आईआरसीटीसीचे हे पॅकेज दुबई आणि अबू धाबी या ठिकाणचं असणार आहे. हे पॅकेज पाच दिवस आणि चार रात्रीचं आहे. तसंच या पॅकेजमध्ये पर्यटकांना  बुर्ज खलीफा  दाखवण्यात येणार आहे. यासोबतच लोकं क्रूज राईटची आणि मिरॅकल गार्डनची मजा  घेऊ शकतात. 

या टूर पॅकेजमध्ये खास  गोष्ट ही आहे  की यात बेली डान्स बघताना तुम्ही  जेवणाचा आनंद घेऊ शकता. तसंच अनेक समुद्र किनारे दाखवण्यात येतील. तसंच शॉपिंग करण्याची हौस असलेल्या लोकांसाठी दूबई हे खूप खास ठिकाण मानलं जातं. तुमच्या खिशाला आरामशीर परवडेल अशा किमतीत तुम्ही भरपूर खरेदी  या ठिकाणी करू शकता. 

यासाठी तुम्हाला १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात कामातून सुट्टी मिळवणं आवश्यक आहे. कारण हे पॅकेज खास  त्यादिवसांसाठीच आहे. त्यासाठी तुम्हाला  हे दिवस  तुम्हाला मोकळे  ठेवावे लागतील. या पॅकेजप्रमाणे १६ फेब्रुवारीला स्पाईसजेट एयरलाइंसने तुम्हाला जयपूर  ते दुबईला जाता येणार आहे. परत २१ तारखेला हे विमान दुबईवरून जयपूर या ठिकाणी लँण्ड होणार आहे. 

या पॅकेजचा आनंद तुम्हाला एकट्याला घ्यायचा असेल तर महाग पडू शकतं. याऊलट फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर ते खर्चाच्या मानाने बरं पडेल.  एका व्यक्तीसाठी या टूरचा खर्च  ६५  लाख  ९१० रुपये इतका येणार आहे. तर २ व्यक्तींसाठी हा खर्च ५७ हजार २० रुपये इतका येणार आहे.  तर तीन व्यक्तींसाठी ५६ हजार ७५५ इतका खर्च येणार आहे.  तर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर वेळ न घालवता लगेच तयारीला लागा.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स