शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

शॉपिंग करा किंवा मार खा; टुरिझमचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 08:18 IST

मार्केटची ख्याती असते. तिथल्या वस्तूंची, दर्जाची, फॅशनची आणि किमतीची चर्चा तुम्ही अनेकदा आपल्या मित्रमंडळींकडूनच ऐकलेली असते.

एखादं मार्केट शॉपिंगसाठी खूपच फेमस असतं. अनेक ठिकाणची लोकं तिथे येऊन शॉपिंग करतात. तिथे वस्तू स्वस्त तर मिळतातच, पण तिथे व्हरायटीदेखील प्रचंड असते आणि अत्याधुनिक फॅशनच्या सगळ्या गोष्टी सर्वांत पहिल्यांदा आपल्याला तिथे पाहायला मिळतात, अशी त्या मार्केटची ख्याती असते. तिथल्या वस्तूंची, दर्जाची, फॅशनची आणि किमतीची चर्चा तुम्ही अनेकदा आपल्या मित्रमंडळींकडूनच ऐकलेली असते.

त्यामुळे तुम्हीही ठरवून कधी तरी त्या मार्केटमध्ये जाता. मार्केट खरोखरच खूप छान असतं. सगळीकडे फॅशनेबल वस्तू लावलेल्या असतात. काय घेऊ आणि काय नको, असं तुम्हाला होऊन जातं. एखाद्या दुकानासमोर तुम्ही रेंगाळता. तिथल्या वस्तू न्याहाळता. एखादी वस्तू तुम्हाला खूपच आवडते. तुम्ही तिची किंमत विचारता. दुकानदार तिची किंमत सांगतो, मग तुम्ही त्याच्याशी थोडी घासाघीस करता, अमुक एवढ्या किमतीत ती वस्तू दिली तरच घेईन असं सांगता, हो-नाही करत दुकानदार तुम्ही सांगितलेल्या किमतीत ती वस्तू द्यायला तयार होतो; किंवा दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही जी वस्तू एकदोनदा न्याहाळता, हातात घेऊन बघता, त्यावेळी दुकानदारच तुम्हाला म्हणतो, ‘घेऊन टाका ती वस्तू, फार भारी आहे, अशी वस्तू कुठेच तुम्हाला मिळणार नाही.’ तो फारच मागे लागलाय म्हणून आणि त्यानं आणखी डोक्याला कटकट करू नये म्हणून तुम्ही त्याला त्या वस्तूची इतकी घालूनपाडून किंमत सांगता की दुकानदारच नाही म्हणेल आणि गप्प बसेल! पण आश्चर्य म्हणजे त्या इतक्या कमी किमतीलाही तो दुकानदार ती वस्तू द्यायला तयार होतो. या दोन्ही प्रकारांत तुम्ही जर ती वस्तू विकत घ्यायला नकार दिला, तर काय होतं, होऊ शकतं याचाही अनेकांनी अशा ठिकाणी अनुभव घेतलाय. लगेच तुम्हाला दमदाटी केली जाते, चार-पाच गुंडपुंड तुमच्या आजूबाजूला जमा होतात. शेवटी ती वस्तू नाइलाजानं तुम्हाला घ्यावीच लागते !

अशाच प्रकारचा एक नवा फंडा आता चीनमध्ये सुरू झालाय. त्यासाठीचं नवं टुरिझमच तिथे सुरू झालंय. त्याला ‘फोर्स शॉपिंग’ किंवा ‘फोर्स टुरिझम’ असं म्हटलं जातं. ‘टुरिस्ट ट्रॅप’ या नावानंही हा प्रकार ओळखला जातो. नेमकं काय होतं या प्रकारात? पर्यटन हा जगभरात कायमच प्रत्येकाच्या आवडीचा आणि ओढीचा प्रकार मानला जातो. कोरोनाकाळात थांबलेलं पर्यटनही आता दामदुपटीनं सुरू झालंय. याचा फायदा घेऊन नवनवीन टुरिस्ट कंपन्या पर्यटकांना नवनवीन आमिषं दाखवताहेत. अतिशय स्वस्तात ते टूर घेऊन जातात. लोकांनाही वाटतं, अरे इतक्या स्वस्तात इतकी ठिकाणं आणि इतक्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळताहेत, तर मग जायला काय हरकत आहे? अशा आकर्षणांना ते हमखास बळी पडतात. पण मग काय होतं? - पर्यटकांना स्वस्तात टूरला तर ते घेऊन जातात, पण त्यानंतर पर्यटकांनी अमुकच दुकानांतून खरेदी करावी म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते. हे दुकानदार मग टुरिस्ट कंपन्यांना त्यांच्या दुकानातून झालेल्या विक्रीचा हिस्सा देतात. कंपन्या त्यांचा ‘तोटा’ मग अशा तऱ्हेनं वसूल करून घेतात! त्यांच्या पर्यटन रणनीतीचाच हा एक भाग असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी या कंपन्या पर्यटकांना घेऊन जातात, त्या दुकानांची ते वारेमाप स्तुती करतात. खोटी माहिती देतात. समजा पर्यटकांनी या दुकानांतून वस्तू घेण्यास नकार दिला तर मग या कंपन्या आपल्या मूळ वृत्तीवर येतात. पर्यटकांना धमकावणं, त्यांना डांबून ठेवणं, मारहाण करणं, त्यांच्या सुविधा कमी करणं.. असले प्रकार सुरू करतात. टूर अजून बाकी असल्यानं आणि पर्यटकांना पुन्हा सुरक्षित घरी जायचं असल्यानं  ते घाबरून या दुकानांतल्या कमअस्सल आणि महाग वस्तू नाइलाजानं खरेदीही करतात! 

चीनमध्ये घडलेला असाच एक प्रकार आता जगभरात गाजतो आहे. चीनमधील एक टुरिस्ट कंपनी काहीजणांना टूरवर घेऊन गेली. तिथे पर्यटकांना गादी, उशा, चादरी, ब्लँकेट्स... असलेल्या एका दुकानात नेण्यात आलं; पण त्यांनी तिथून काहीही खरेदी न केल्यानं सर्वच्या सर्व ३७ पर्यटकांना धमक्या दिल्या गेल्या, त्यांना कित्येक तास चक्क डांबून ठेवण्यात आलं. एका पर्यटकानं सोशल चिनी सोशल मीडियावर कशीबशी ही माहिती शेअर केल्यानंतर त्यांची सुटका झाली!

सोनं विकत घ्या, नाही तर खाली उतरा !काही दिवसांपूर्वीही चीनमध्ये असाच आणखी एक प्रकार घडला होता. टुरिस्ट कंपनीनं एका परिवाराला एका सोन्याच्या दुकानात नेलं. तिथे त्यांना सोन्याचं ब्रेसलेट घेण्याची सक्ती करण्यात आली. त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांची टूरच रद्द करून टाकली आणि भर रस्त्यात बसमधून खाली उतरवून दिलं. अनेकांचं म्हणणं आहे, चीनमध्ये फोर्स टुरिझमचा हा नवाच प्रकार अलीकडे उदयाला येतो आहे!