शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

चिमुकल्यांसोबत पिकनिकला गेल्यावर त्यांना ठेवा स्मार्टफोनपासून दूर अन् खेळा 'हे' स्मार्ट गेम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 22:46 IST

मुलांच्या आरोग्याचे किंवा डोळ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर रोड ट्रिप दरम्यान तुम्ही असे काही खेळ खेळू शकता, ज्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि मुलंही मोबाईपासून दूर राहतील.

कुटुंबासह रोड ट्रिपला जाणे हा रोमांचकारी तसेच अविस्मरणीय अनुभव आहे. अनेकदा लहान मुलं रोड ट्रिपला कंटाळतात. त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी मुलं मोबाईल बघू लागतात आणि ते तासन्तास मोबाईवर गेम खेळतात किंवा त्यावर व्हिडिओ पाहतात. मुलांना क्षणात ठेवण्यासाठी पालकही त्यांना मोबाईल देतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हा मुलांसाठी चांगला टाईमपास आहे, पण त्यांच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला मुलांच्या आरोग्याचे किंवा डोळ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर रोड ट्रिप दरम्यान तुम्ही असे काही खेळ खेळू शकता, ज्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि मुलंही मोबाईपासून दूर राहतील.

मुलांच्या वयानुसार खेळ खेळाव्हेरीवेल फॅमिलीच्या मते, लांबच्या रोड ट्रिपमध्ये मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या वयानुसार गेम खेळल्याने प्रवास सुलभ होण्यास मदत होईल. खेळ असे असावेत की संपूर्ण कुटुंब एकत्र खेळू शकेल. ज्या मुलांना ट्रिपमध्ये अस्वस्थ वाटत असेल किंवा उलट्या होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी खेळ विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.

फ्लिप फोनिक्स गेमबहुतेक मुलांना स्वयंपाकाची आवड असते. अशा परिस्थितीत फोनिक्स साउंड शिकवण्यासाठी फ्लिप फोनिक्स गेम उपयुक्त ठरतो. त्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या आकारांची कार्ड असतात आणि त्यावर पाठीमागून अक्षरे लिहिली असतात. जेव्हा मुलं स्वयंपाक करताना ते कार्ड पलटवतात तेव्हा त्यांना त्यावर लिहिलेली वर्णमालादेखील वाचायला सांगावे. अशा प्रकारे मुलं रोड ट्रिपमध्ये गेम खेळतात आणि वर्णमालादेखील शिकतात.

वर्ड फोनिक्स गेमजर मुल मोठे असेल आणि त्याला अक्षरं व्यवस्थित वाचता येत असतील तर रोड ट्रिप दरम्यान वर्ड फोनिक्स गेम खेळता येईल. त्यात तीन अक्षरांची स्लिप तयार करा. आता मुलाबरोबर स्टोन, पेपर, सीझर खेळा. जो जिंकेल तो स्लिप उचलेल आणि येथे लिहिलेली अक्षरे जोडून शब्द तयार करेल.

काठी खेळरोड ट्रिप दरम्यान, आपण मुलांना फोनिक्स शिकवण्यासाठी आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर करू शकता. आईस्क्रीम स्टिकवर इंग्रजीतील सर्व 26 अक्षरे लिहा. मुलाला काठी उचलण्यास सांगा. मूल येईल त्या काठीवर लिहिलेली अल्फाबेट सांगेल आणि त्यापासून तयार झालेले तीन शब्दही सांगेल.

न्यूजपेपर हंट गेममुलांना हंटिंगचे गेम आवडतात. संपूर्ण कुटुंब हा खेळ खेळू शकतो. त्यात एक वर्तमानपत्र घ्या आणि एक अक्षर म्हणा. प्रत्येकाला त्या अक्षराशी संबंधित शब्द शोधायला सांगा. ज्याला सर्वात कमी वेळेत सर्वात जास्त शब्द सापडतील तो विजेता असेल. हा एक अतिशय मजेदार खेळ आहे आणि बराच काळ मुलं हा खेळ खेळू शकतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स