शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​...तर हे आहे ‘अमर ज्योत’ धबधब्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 13:23 IST

याठिकाणी एक ज्योत नेहमी तेवत राहते. पाण्याच्या मध्ये ज्योत हेच येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. ही ज्योत अक्षय असल्याचे सांगितले जाते मात्र ते खरे नाही.

न्यूयॉर्कमधील चेस्टनट रिजनल पार्क मध्ये एक लहानसा धबधबा असून त्याला अमर ज्योत धबधबा किंवा इटरनल फ्लेम फॉल असेही म्हणतात. असे म्हणण्याचे कारण म्हणजे याठिकाणी एक ज्योत नेहमी तेवत राहते. पाण्याच्या मध्ये ज्योत हेच येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. ही ज्योत अक्षय असल्याचे सांगितले जाते मात्र ते खरे नाही. कधीकधी ही ज्योत विझते पण त्याचवेळी तेथे गेलेले कोणी हायकर, ट्रेकर ती पुन्हा प्रज्वलित करतात. १२१३ एकर परिसरात असलेले हे उद्यान हायकिग ट्रेलस, सायकलींग ट्रॅक, मैदाने, टेनिस कोर्ट, पर्यटकांसाठी विविध सुविधांनी युक्त असलेले हे स्थळ प्रामुख्याने उन्हाळी पर्यटन स्थळ आहे. मात्र ज्या कारणाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे त्या इटरनल फ्लेम धबधब्यापाशी पर्यटकांची फारशी गर्दी नसते. येथे जाताच कुजक्या अंड्यासारखा वास येऊ लागतो. हा वास धबधब्याच्या खडकांखाली असलेला व लीक होत असलेल्या नैसर्गिक गॅसचा आहे. या धबधब्यात एक गुहेसारखा भाग असून याच्या आत गॅस लिक होतो तेथेच ही फ्लेम पेटते. गुहेप्रमाणे कपार असल्याने या ज्योतीला आपोआपच पाणी व वाºयापासून संरक्षण मिळते. उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने हा धबधबा वाहू लागतो. कधीकधी खूप पाऊस झाल्याने त्याची उंची ३० फुटांपर्यंतही वाढते. पाच फुट उंचीच्या मधल्या गुहेत ही ज्योत गॅस किती लिक होतो त्यानुसार लहान मोठी होते. कधीकधी ती चार ते ८ इंचांपर्यंतही दिसते. पाण्याचा वेग फार वाढला तर ही ज्योत कधीकधी विझते. पृथ्वीवर या प्रकारचा हा एकमेव धबधबा असल्याचे सांगितले जाते.