शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठामपामध्ये तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:28 IST

 ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीनेदेखील गिरवला आहे. पहिल्याच बैठकीत या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करून बिल्डरधार्जिन्या धोरणाला जणू पुन्हा पाठिंबाच दिल्याचे दिसून आले आहे.काही महिने वादग्रस्त ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. तिची पहिलीच बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या ...

 ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीनेदेखील गिरवला आहे. पहिल्याच बैठकीत या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करून बिल्डरधार्जिन्या धोरणाला जणू पुन्हा पाठिंबाच दिल्याचे दिसून आले आहे.

काही महिने वादग्रस्त ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. तिची पहिलीच बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या विषयपटलावर महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होत असलेले ४२५ वृक्ष, तर बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावांमध्ये बाधित होत असलेले एक हजार ९० वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. त्यामध्ये २२८ वृक्ष हे सुबाभूळ जातीचे आहेत. या सर्व प्रस्तावांना समितीने मान्यता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये वृक्षांचा ठरलेला अडथळाही समितीने दूर केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये बाधित होणारे वृक्ष तोडण्यात येणार असले, तरी त्या बदल्यात १६ हजार ३५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तसेच पुनर्राेपण करण्यात येणाºया १६६२ वृक्षतोडीच्या बदल्यात संबंधित विकासकांकडून एकूण ८ हजार ३१० वृक्षलागवडीसह शहरात एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीच्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून समितीच्या धोरणाप्रमाणे वृक्षलागवड करण्यात येईल का आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडून खरोखरच त्यांची पाहणी केली जाईल का, असे सवाल आता शहरातून उपस्थित केले जात आहेत.वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यासाठी महापालिका आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायालयीन पातळीवरील होणाºया निर्णयांचा अभ्यास करून त्याआधारे धोरण ठरवण्यासाठी चंद्रहास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली, तर प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या अटी आणि शर्तींबाबत अभ्यास करण्यासाठी संतोष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.तसेच वृक्षवल्ली प्रदर्शनाचे सुयोग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. यंदा १३ ते १५ जानेवारीला हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणे