शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानला पर्यटकांची गर्दी, पण मुक्काम परवडेना; वर्षाविहाराचा घेतला मनसोक्त आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 06:35 IST

माथेरानला येण्यासाठी नेरळ येथे टॅक्सीसाठी गेली दोन दिवस लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

माथेरान : वर्षा सहलीसाठी शनिवारी व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. मात्र, धबधब्यांवर बंदी असल्याने मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली. त्यामुळे गेली दोन दिवस माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मात्र हॉटेल, लॉजचे बुकिंग संपल्याने अनेकांनी राहण्याचे दरही वाढवले होते. त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या पैशांत आम्ही गोव्याला जाऊन परत येऊ अशीही टिप्पणी काही पर्यटकांनी केली.

माथेरानला येण्यासाठी नेरळ येथे टॅक्सीसाठी गेली दोन दिवस लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दस्तुरी नाक्यावर खासगी वाहनांची पार्किंग व्यवस्था वनविभागाने केली होती. जवळपास सहा हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज आहे. त्यामुळे माथेरानला दोन दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. रस्त्यावर सर्वत्र पर्यटकांची गर्दी होती. कोणी हात रिक्षा तर कोणी घोड्याचा आधार घेऊन माथेरान गाठत होते. अनेकांनी तर पायीच माथेरान गाठले. रेल्वेच्या शटल सेवेलाही मोठी गर्दी होती.

आम्ही पती-पत्नी यावर्षी पहिल्यांदाच माथेरानला वर्षा सहलीसाठी आलो. एवढी गर्दी अन्य पर्यटन ठिकाणी पाहिली नव्हती. मात्र वाहतुकीचे आणि मुक्कामाचे नियोजन न परवडणारे होते. एवढ्या खर्चात तर आम्ही विमानाने गोवा रिटर्न होऊ शकतो. त्यामुळे इच्छा असतानाही परत निघालो. मात्र खूप मजा आली. परत नक्कीच माथेरानला येऊ, पण सुट्यांच्या दिवसांत येणे टाळू. - नागार्जुन अवस्थी, पर्यटक, मुंबई

मनसोक्त भिजण्याचा आनंदपावसाच्या रिमझिम जलधारा अंगावर झेलत पर्यटक माथेरानमधील  पॉईंट्सवरील नयनरम्य देखावे न्याहाळत होते. कोणी पायी तर कुणी घोडेस्वारी, हातरिक्षांनी फिरत होते. घाटरस्त्यात असणाऱ्या धबधब्यांच्याखाली पर्यटक मनसोक्त भिजत होते. माथेरानमध्ये धबधबा नसल्याने शारलोट तलावाच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली पर्यटकांनी आनंद घेतला.

हॉटेल्स आणि लॉजिंग फुल्लमोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने हॉटेल्स व लॉज फुल्ल झाले होते. त्यामुळे अनेकांना मुक्काम करायचा असताना परत जावे लागले. तर अनेकांनी वाढीव दर देऊन मुक्काम केला. 

व्यावसायिक समाधानीपर्यटक मोठ्या संख्येने आल्याने स्टॉल्स धारकांसह रेस्टॉरंट, कँटीन, चिक्की, किरकोळ विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय झाला. खरेदीसाठी बाजारात मोठी रेलचेल होती. 

टॅग्स :tourismपर्यटन