शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

'सिटी ऑफ शेम'म्हणून ओळखलं जाणारं 'हे' शहर बनलं युरोपची सांस्कृतिक राजधानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:41 IST

इटलीतील शहर मातेराला अनेक वर्षांपासून गरीबी आणि मागसलेल्यामुळे राष्ट्रीय अपमानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आता परिस्थिती बदललेली असून गुहांमध्ये तयार करण्यात आलेले चर्च, महाल आणि विकास कार्यांमुळे मातेरा हे शहर 2019साठी युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

इटलीतील शहर मातेराला अनेक वर्षांपासून गरीबी आणि मागसलेल्यामुळे राष्ट्रीय अपमानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आता परिस्थिती बदललेली असून गुहांमध्ये तयार करण्यात आलेले चर्च, महाल आणि विकास कार्यांमुळे मातेरा हे शहर 2019साठी युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे, येथे येणारे पर्यंटक फक्त 22 हजार डॉलर (जवळपास 1538 रुपये) खर्च करून या शहराचे टेम्पररी सिटीजन बनू शकतात आणि दक्षिण रोमचा 400 किलोमीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर पूर्ण वर्षभर फिरू शकतात. 

जुन्या गोष्टी मागे सारून

मातेराचे मेयर राफेलो द रुगिएरी यांनी सांगितले की,  मातेराच्या फक्त नावानेच आमची मान शर्मेने खाली झुकत असे. परंतु आता ही गोष्ट जुनी झाली. इथुन पुढे मातेरा नाव ऐकताच आमची मान अभिमानाने उंचावेल. 1950च्या दशकामध्ये इटलीच्या प्रधानमंत्र्यांनी मातेराचा विकास न झाल्यामुळे नाराजी व्यक्ती केली होती. यावेळी मातेरामधील लोकं तेथील गुहांमध्ये वीजेशिवाय वास्तव्य करत असत. त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणीही नव्हते. 

मातेरा बॅसिलिकाता क्षेत्रामध्ये वसलेलं आहे. वर्षभरामध्ये मातेरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांसाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. मातेरा-बॅसिलिकाता 2019 फाउंडेशनचे संचालक पाओला वेरी यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमची अशी इच्छा आहे जगभरातील पर्यटकांनी येथे येऊन येथील संस्कृतिचा अनुभव घ्यावा. 

'येरूशलम ऑफ द वेस्ट' 

रुगिएरी यांनी सांगितल्यानुसार, मातेरा जगभरातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या 'राला येरुशलम ऑफ द वेस्ट' असंही म्हटलं जातं. पुरातत्व अवशेषांनुसार असं सांगितलं जातं की, येथे गेल्या 8 हजार वर्षांपासून लोकं राहत असतात. 

पाओला वेरी सांगतात की, हे शहर लाइम स्टोनच्या डोंगरावर वसलेलं आहे. कदाचित त्यामुळेच येथे फार कमी पर्यटक भेट देत असतात. तुम्ही हे शहर एका दिवसांत फिरूच शकत नाही. येणाऱ्या वर्षभरात पर्यटकांसाठी म्युझिक, रिडिंग, फूड, प्रदर्शन याशिवाय 300 कल्चरल परफॉर्मेन्स असणार आहेत. 

सगळ्यांपासून दूर असलेलं 'मातेरा'

मातेरा शहर युरोपमधील शहरांपेक्षा वेगळं शहर आहे. येथे कोणतंही विमानतळ, हायस्पीड स्टेशन आणि मोटरवे नाही. येथील काही लोकांना अशी आशा आहे की, मातेरा सर्व सुखसोईपासून दूर असलं तरिही त्याचं असं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्यामुळेच येथे येणारे पर्यटक एका वेगळ्या संस्कृतिचा अनुभव येथे घेऊ शकतात. आपल्यामध्ये दडलेल्या कलागुणांना बाहेर काढू शकतात. मातेरामध्ये ख्रिस्ती धर्माच्या सुरूवातीच्या काळातील अनेक घरं अस्तित्वात आहेत. येथे अने चित्रपटांची शुटींगही करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये  मेल गिब्सन यांचा  'द पॅशन ऑफ क्राइस्ट', पीटर पासोलिनी यांचा 'गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मॅथ्यू'चा समावेश आहे. फ्रान्सची एरियान बेयो यांचं असं म्हणणं आहे की, मातेराला युरोपची सांस्कृतिक राजधानी बनवल्यामुळे येथे विकास कार्याला चालना मिळेल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन