शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

​काश्मीर खोऱ्यात आल्याचा भास होणारे ‘हे’ आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 12:06 IST

याठिकाणी पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात आल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. जाणून घ्या या पर्यटन स्थळाबद्दल !

चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वत रांगा पावसाळ्यात हिरवी शाल पांघरतात. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात आल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. चिखलदऱ्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. याशिवाय याठिकाणी पंचबोल पॉर्इंटचे अद्भुत सौंदर्य पाहावयास मिळते. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथे कॉफीचा बागा असून खोल दरीला लागूनच पाच उंच डोंगरांची शृंखला आहेत. देव पॉर्इंटवरही नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडते. याठिकाणी महाभारताविषयी रोचक माहितीदेखील मिळते. येथे एक भीमकुंड असून ते सुमारे ३ हजार ५०० फूट खोल आहे. शिवाय एक मनमोहक सुंदर असा धबधबाही आहे. पौराणिक कथेनुसार भीम कीचकाचा वध केल्यानंतर त्याला खोल दरीत फेकून याच धबधब्याखाली स्नान केले होते. पर्यटकांना येथे नक्षीदार आणि पोलाद, कांस्य आणि तांब्याच्या तोफा पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळाचा शोध ब्रिटिशांनी १८२३ मध्ये लावला होता.या पर्यटनस्थळाला पौराणिक महत्त्व आहे. द्वापर युगात अज्ञातवासात असलेले पाच पांडवांनी काही काळ येथे घालवला होता. कीचकने द्रौपदीसोबत दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, तो इथेच. राग अनावर झाल्याने भीमने त्याचा वध करून त्याला चिखलदरा येथील खोल दरीत फेकून दिले होते. अशी आख्यायिका सांगितली जाते.  या पावसाळ्यात अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पर्यटनस्थळी अवश्य भेट द्यावी.   Also Read : ​मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !                   ​​ : आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?