शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 23:58 IST

IRCTC Tour Package: जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे.

नवी दिल्ली : ज्या लोकांना फिरायला आवडते त्यांच्यासाठी गोवा नेहमीच आकर्षक राहिला आहे. गोव्याचे निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि गोवा समुद्रकिनारा देशी तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. नवविवाहित जोडप्यांना सुद्धा फिरण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे. (irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa)

जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे. आयआरसीटीसीने या गोवा टूर पॅकेजला 'ग्लोरियस गोवा एक्स मुंबई' असे नाव दिले आहे. 

टूरची सुरूवातआयआरसीटीसीच्या तीन रात्री आणि चार दिवसांच्या गोवा टूरसाठी दर शुक्रवारी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून रात्री 11:05 वाजता कोकण कन्या एक्सप्रेस ट्रेन रवाना होते. एका रात्रीच्या प्रवासानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी उत्तर गोव्यातील थिविम रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. तेथून यात्रेकरूंना हॉटेलमध्ये नेले जाईल. त्यानंतर यात्रेकरूंना उत्तर गोव्याचे पर्यटन स्थळ दाखविले जाईल. 

उत्तर गोव्यातील यात्रेकरूंना अगुआडा किल्ला, कॅंडोलिम बीच, बाघा बीच, अंजुना बीच, डोना पौला आणि 'क्वीन ऑफ द सी बीच' असे म्हटली जाणारी कळंगुट बीच सारखी ठिकाणे पाहायला मिळतील. यानंतर, रात्रीचे जेवण आणि रात्री विश्रांती घेतल्यानंतर यात्रेकरूंना दुसऱ्या दिवशी दक्षिण गोव्यात नेले जाईल.

कोणत्या सुविधा मिळणार?या दौऱ्यात गोव्याहून परतण्यासाठी थर्ड एसी आणि सेकंड स्लीपर क्लासची व्यवस्था असेल. कम्फर्ट आणि स्टँडर्ड ऑप्शननुसार प्रवासी हे डबे निवडू शकतात. यासोबतच यात्रेकरुंना रेल्वे स्टेशनवरून हॉटेलमध्ये आणण्याची आणि नेण्याची व्यवस्था केली जाईल. यासह, सर्व साइटसाठी एसी गाड्यांची व्यवस्था असेल.

किती येईल खर्च?या IRCTC पॅकेजद्वारे गोव्याला जाण्यासाठी तुम्हाला 11,990 रुपये खर्च करावे लागतील.

टॅग्स :goaगोवाIRCTCआयआरसीटीसी