शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'ही' ट्रेन नव्हे,चालते-फिरते फाईव्ह स्टार हॉटेल; उन्हाळ्याच्या सुट्टीत करू शकता बुक, रेल्वेची खास ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:10 IST

irctc : ट्रेन हेच ​​फिरते पंचतारांकित हॉटेल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

नवी दिल्ली : लोकांनी आतापासूनच उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन सुरू केले असेल. ट्रेन किंवा फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी आधीच लोकांकडून केल्या जातात. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेने एक खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ट्रेनमध्येच पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा आहेत. ट्रेन हेच ​​फिरते पंचतारांकित हॉटेल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

ही ट्रेन पर्यटकांना, भाविकांना भगवान रामाशी संबंधित ठिकाणावर घेऊन जाईल. IRCTC उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एसी डिलक्स ट्रेन चालवणार आहे. यामध्ये एसी फर्स्ट कूप, एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड अशा तीन श्रेणीतील कोच असतील. ज्याद्वारे प्रत्येक वर्गातील लोक प्रवास करू शकतात. ही ट्रेन 7 जून रोजी धावणार आहे. संपूर्ण प्रवास 17 रात्र आणि 18 दिवसांचा असेल. 

या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी देशातील 14 शहरांना भेट देऊ शकतील आणि 39 धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील. ही ट्रेन दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, श्री रामायण यात्रा ट्रेन अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचल आणि नागपूर मार्गे दिल्लीला परतेल. यामध्ये प्रवाशांना प्रभू रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देता येणार आहे.

श्री रामायण यात्रा ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अनेक पर्याय असतील. याचा अर्थ प्रवासी त्यांच्या सोयीनुसार जवळच्या स्थानकावरून चढू आणि उतरू शकतात. दिल्ली व्यतिरिक्त, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर आणि लखनऊ स्थानकांवर ट्रेनमध्ये चढता येते आणि परतीच्यावेळी झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा आणि सफदरजंग स्टेशनवर उतरता येते.

काय आहे प्रवासाचे भाडे?चारही श्रेणींचे भाडे वेगवेगळे आहे. हे सिंगल, डबल आणि ट्रिपल शेअरिंगसाठी बुक केले जाऊ शकतात. फर्स्ट एसी कूपे 166810 रुपये, फर्स्ट एसी 145745 रुपये, सेकंड एसी 134710 रुपये, थर्ड एसी 94600 रुपये आहे. दरम्यान, हे भाडे 33 टक्के डिस्काउंटनंतर आहे.

'या' ठिकाणांना देता येईल भेट!- अयोध्या- रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, सरयू घाट.- नंदीग्राम- भारत-हनुमान मंदिर आणि भारत कुंड.- जनकपूर- राम जानकी मंदिर, धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड.- सीतामढी- जानकी मंदिर आणि पुनौरा धाम.- बक्सर- राम रेखा घाट, रामेश्वर नाथ मंदिर.- वाराणसी- तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती.- सीता संहित स्थळ, सीतामढी - सीता माता मंदिर.- प्रयागराज- भारद्वाज आश्रम, गंगा-यमुना संगम, हनुमान मंदिर.- शृंगावेरपूर- शृंगी ऋषी समाधी आणि शांता देवी मंदिर, रामचौरा.- चित्रकूट- गुप्त गोदावरी, रामघाट, सती अनुसुईया मंदिर.- नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी, सीतागुफा, काळाराम मंदिर.- हंपी: अंजनाद्री टेकडी, विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर.- रामेश्वरम- रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी.- भद्राचलम- श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, अंजनेय मंदिर.- नागपूर- रामटेक किल्ला आणि मंदिर.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसी