शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचा अभ्यास म्हणतोय की पर्यटकांच्या आवडीत गोवा आहे नंबर 1 ! फिरण्यासाठी होतोय स्मार्ट फोनचा वापर!

By admin | Updated: May 29, 2017 19:00 IST

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुगल इंडिया रिपोर्टनुसार गोवा हे भारतातलं पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे.

- अमृता कदमएकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्च आणि मंदिरं, सी-फूडचे नानाविध प्रकार, पब आणि क्लब...मौजमजा करायची असो की थोडासा निवांतपणा हवा असो गोवा बेस्ट आॅप्शन आहे. हे आम्ही नाही सांगत तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुगल इंडिया रिपोर्टनुसार गोवा हे भारतातलं पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे.

 

                    गोव्याखालोखाल पर्यटकांची पसंती मिळवली आहे अंदमान आणि निकोबार बेटांनी. निसर्गानं मुक्त हस्ते सौंदर्य उधळलेल्या या बेटांच्या लोकप्रियतेत वर्षभरात 39.8 टक्के एवढी वाढ झाली आहे. मनाली, सिमला आणि उटी या हिलस्टेशन्सनीही पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये स्वत:चं स्थान टिकवून ठेवलं आहे. फेब्रुवारी ते एप्रिल 2017 दरम्यान भारतीयांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. परदेशी पर्यटनस्थळांचा विचार केला तर भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे अमेरिकेला. त्याखालोखाल क्रमांक आहे संयुक्त अरब अमिरातीचा. त्यातही दुबईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. परदेशात फिरायला जाणारे पर्यटक थायलंडलाही आपली पसंती देतात. थायलंडच नाही तर नेपाळ, इंडोनेशिया आणि भूतानसारख्या छोट्या शेजारी देशांच्याबद्दलही भारतीय प्रवाशांच्या मनात कुतूहल आहे. त्यामुळेच या देशांमधल्या पर्यटनस्थळांबद्दल, इथल्या प्रवासाबद्दल विचारल्या जाणारी माहितीमध्ये अनुक्र मे 64.8 टक्के, 42.1 टक्के आणि 40.8 टक्के इतकी वाढ झाली आहे.

 

                               भारतीय पर्यटक केवळ वेगवेगळे देश आणि तिथली पर्यटनस्थळं याबद्दलच माहिती घेत नाहीत तर विमानप्रवास आणि परदेशातील राहण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या सोयीबद्दलही जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या रिपोर्टवरु न स्पष्ट होतं. वेगवेगळ्या अ‍ॅप्स आणि वेबसाइटमुळे प्रवासाचं नियोजन आणि महत्त्वाचं म्हणजे राहण्याच्या सोयी खिशाला परवडणाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा एखादी मोठी ट्रीप प्लॅन करणं हे केवळ मेट्रो सिटीमध्ये नाही तर अगदी लहान शहरांमध्येही वाढताना दिसत असल्याचं हा अहवाल आवर्जून नमूद करतो. गुगल सर्चच्या रिपोर्टमधील आकड्यांच्याच भाषेत सांगायचं तर पर्यटनस्थळांबद्दल माहिती घेणाऱ्या लोकांपैकी 40.8 टक्के लोक हे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु , हैदराबाद, अहमदाबाद या मेट्रो सिटीच्या बाहेरचेच होते. हातात आलेल्या स्मार्टफोन्समुळे कितीही लांबच्या प्रवासाचं नियोजन कसं सहजसोपं झालंय हेही या अहवालातून कळतं. मोबाईलवरून पर्यटनस्थळांबद्दलची, प्रवासाबद्दलची माहिती घेणाऱ्यांच्या संख्येत थोडी थोडकी नाही तर 96 टक्क्यांनी वाढ झालीये,.

       फिरण्याच्या बाबतीत आपण नेहमीच परदेशी प्रवाशांकडे खूप कौतुकानं पाहतो. पण आता प्रवासाबद्दलचा भारतीयांचा उत्साह आणि उत्सुकताही वाढत असल्याचं या अहवालाच्या निमित्तानं स्पष्ट झालंय!