शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

एकट्यानं फिरायला जाताय, खुशाल जा! फक्त या 6 गोष्टी बरोबर न्यायला विसरू नका! या गोष्टी प्रवासात घेतात तुमची काळजी!

By admin | Updated: May 31, 2017 18:13 IST

एकट्यानं फिरायला अवश्य जा पण प्रवासात स्वत:ला जपण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुमच्या सामानात ठेवाच!

- अमृता कदमआजकाल एकट्यानंच फिरायला निघणाऱ्या हौशी भटक्यांची संख्या वाढत आहे. आपली सवड पाहून स्वत:सोबत थोडा निवांत वेळ घालवता यावा, नव्या अनुभवांना कोणत्याही बंधनांशिवाय सामोरं जाता यावं म्हणून एकट्यानंच बाहेर पडण्याला पसंती दिली जाते. पण एकट्यानं फिरण्यातल्या थ्रीलची हौस भागवतानाच स्वत:च्या सुरक्षेचाही विचार करणं गरजेचं आहे. प्रवासात आपली काही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच प्रवासात स्वत:ला जपण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुमच्या सामानात असणं आवश्यकच आहे.

 

                      एकट्यानं प्रवास करताना सोबत हे घ्याच!1. फर्स्ट एड किटखरंतर एकट्यानंच नाही तर अगदी ग्रुपसोबत फिरायला निघतानाही तुमच्या सामानात हे फर्स्ट एड किट असलंच पाहिजे. काही प्राथमिक औषधांसोबतच तुम्हाला जर काही आजार, अ‍ॅलर्जी असतील तर त्यावरचीही औषधं सोबत ठेवा. तसंच त्यासंबंधीचं प्रिस्क्रिप्शनही या बॉक्समध्ये असू द्या. मुलींनी प्रवासात हायजिन जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टीही ठेवाव्यात.

 

2. पेपर स्प्रेसुरक्षेचा विचार करून अनोळखी ठिकाणी एकट्यानं फिरताना पेपर स्प्रे तुमच्या पर्समध्ये ठेवायला विसरु नका.

3. एअरपोर्ट कनव्हिनिअन्स अ‍ॅपविमानतळावर वेळेवर पोहचण्याचं टेन्शन, वेळेआधी पोहोचलो तर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आंओ उशीरा पोहचलो तर धावत-पळत सगळ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करायची हा अनुभव अनेकांना येतो. हे टाळण्यासाठी आणि तुम्हाला योग्य वेळेत पोहचवण्यासाठी अनेक एअरपोर्ट कनव्हिनिअन्स अ‍ॅप्स आहेत. शिवाय पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पार पाडाव्या लागणाऱ्या गोष्टींची माहितीही तुम्हाला या अ‍ॅपमधून मिळते. 4. आरामदायी शूजप्रवासातल्या महत्त्वाच्या सामानाच्या यादीत शूजचं काय काम? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण प्रवासामध्ये मनसोक्त भटकत असतानाच तुमची शारीरिक उर्जा वाचवण्यासाठी चांगल्या शूजची नक्कीच मदत होते. शूज आरामदायी असतील तर तुम्ही हवं तितकं पायी भटकू शकता. तसंच प्रवासामध्ये पाय दुखणं किंवा पायाला गोळे येणं, असले त्रासही होत नाहीत. 5. पोर्टेबल बॅटरी चार्जरही गोष्ट अशी आहे, जी घ्यायला तुम्ही अजिबातच विसरु नका. एकट्यानं प्रवास करताना तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. दिवसभर बाहेर फिरताना तुम्हाला प्रत्येकवेळी तुमचा मोबाईल चार्ज करायला वेळ मिळेलच असं नाही. त्यामुळेच जेव्हा गरज पडेल तेव्हा मोबाईल चार्ज करता यावा म्हणून पोर्टेबल चार्जर जवळ असायलाच हवा.

 

                       6. लगेज मॉनिटरप्रवासात तुमचं सामान हरवू नये यासाठी लगेज ट्रॅकर अत्यंत उपयुक्त आहे. कारण एकट्यानं प्रवास करताना तुम्हाला वस्तूंची आठवण करून द्यायला सोबत कोणी नसतं. या मॉनिटरमुळे तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून तुमच्या सामानाचा मागही ठेवू शकता आणि तुम्हाला तुमच्या लगेजसंबंधातले अपडेटही मिळत राहतात. तर मग यापुढे एकट्यानंच ट्रीप प्लॅन करताना सामानामध्ये या सहा महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून ठेवा. कारण सुरक्षित आणि आरामदायी प्रवासच तुम्हाला फिरण्याचा खराखुरा आनंद देऊ शकतो.