शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासात सन्मान द्या आणि आनंद घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 18:47 IST

फ्लाइट अटेन्डन्टशी नीट सहकार्यानं आणि शिष्टाचारानं वागून तुम्ही तुमचा विमान प्रवास अधिक सुखकारक बनवू शकता. ‘जेटब्ल्यू ’या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीत फ्लाइट अटेन्डन्ट असलेल्या अमान्डा प्लेवा हिनं त्यासाठी काय करायला हवं यावर एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आहे.

ठळक मुद्दे* फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमधल्या लोकांना इकॉनॉमी क्लासमधल्या लोकांपेक्षा जास्त चांगली वागणूक दिली जाते, अशी टीका करणारा एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्लेवानं हा ब्लॉग लिहिला.* इकॉनॉमी क्लासमधल्या सगळ्यांशीच फ्लाइट अटेन्डण्ट संवाद साधू शकत नसल्या तरी प्रवाशांनी थोडासा विनम्रपणा आणि शिष्टाचार दाखवला तर त्यांचं काम सहज होऊन जातं.* अदबशीर वागणारे विमानप्रवासी फ्लाइट अटेन्डण्टच्या कायम लक्षात राहतातच.

- अमृता कदमवेळेची बचत आणि आरामदायी प्रवास यामुळे आजकाल विमानप्रवासालाच पसंती दिली जाते. विमानप्रवासात हवाई सुंदरींकडून मिळणारी अदबशीर वागणूक हे विमानप्रवासातल्या कम्फर्टचं एक महत्त्वाचं कारण. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि आपल्या विमानकंपनीचा नावलौकिक जपण्यासाठी या फ्लाइट अटेन्डन्ट नेहमीच खूप मेहनत घेत असतात. बहुधा त्यामुळेच अनेक जण त्यांना गृहीत धरतात आणि त्यांनी आपली अगदीच ताबेदारीच करावी अशी अपेक्षा ठेवतात. पण तसं न करता फ्लाइट अटेन्डन्टशी नीट सहकार्यानं आणि शिष्टाचारानं वागून तुम्ही तुमचा प्रवास अधिक सुखकारक बनवू शकता.‘जेटब्ल्यू ’या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीत फ्लाइट अटेन्डन्ट असलेल्या अमान्डा प्लेवा हिनं त्यासाठी काय करायला हवं यावर एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आहे.

 

तिनं आपल्या या पोस्टमध्ये लोकांकडून येणारे उद्धटपणाचे अनुभव आणि इतरही अडचणींबद्दल सविस्तरपणे लिहिलं आहे. ‘माझ्या कामातला सगळ्यांत वाईट भाग कोणता आहे माहितीये? लोकांचं खाणं उचलणं किंवा अत्यंत रागारागानं भांडणा-या प्रवाशाला समजावणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मी दारात उभी राहून लोकांचं स्वागत करतीये आणि माझ्या तोंडाकडेही न बघता माझ्या अभिवादनाकडे सपशेल दुर्लक्ष करु न जेव्हा लोक जातात तेव्हा खूप अपमानास्पद वाटतं.’’फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमधल्या लोकांना इकॉनॉमी क्लासमधल्या लोकांपेक्षा जास्त चांगली वागणूक दिली जाते, अशी टीका करणारा एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्लेवानं हा ब्लॉग लिहिला. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमधल्या लोकांना वेगळी ट्रीटमेण्ट मिळते, हे प्लेवानं नाकारलं नाहीये. पण त्याचबरोबर आत येताना आमच्या अभिवादनाला हसून ‘हॅलो’ म्हणून प्रतिसाद देणा-या ब-याचशा प्रवाशांमध्ये फर्स्ट क्लासचेच प्रवासी असतात हेसुद्धा तिनं आवर्जून नमूद केलं आहे. ‘बिझनेस क्लासमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या मुळातच मर्यादित असल्यामुळे त्यांच्यासोबत वैयक्तिक संपर्क ठेवणं सोपं जातं. पण इकॉनॉमी क्लासमध्ये जास्त प्रवासी असल्यामुळे फ्लाइट अटेण्डन्टला त्या प्रत्येकाजवळ जाऊन बोलणं शक्य होत नाही. जेव्हा लोकं अशा बिनचेह-याच्या गर्दीचा भाग नसतात, तेव्हा त्यांचं वागणं वेगळं असतं,’ असंही तिनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.इकॉनॉमी क्लासमधल्या सगळ्यांशीच फ्लाइट अटेन्डण्ट संवाद साधू शकत नसल्या तरी प्रवाशांनी थोडासा विनम्रपणा आणि शिष्टाचार दाखवला तर त्यांचं काम सहज होऊन जातं.‘आमच्या काही लक्षात येत नाही असं तुम्हाला वाटत असेल. पण आम्ही प्रवाशांचं वागणं पाहात असतो. तुम्हाला त्याची पावतीही आमच्या वागण्यातून देतो. कधीमधी एखादं फ्री ड्रिंक, तुम्हाला आरामदायी मोकळ्या सीटवर बसायला देणं किंवा तुम्ही बेल वाजवण्याच्या आतच तुम्हाला काय हवं नको त्याची विचारपूस करणं असं काही ना काही आम्ही करतच असतो. अदबशीर वागणारे विमानप्रवासी फ्लाइट अटेन्डण्टच्या कायम लक्षात राहतातच,’ प्लेवानं ही गोष्ट आवर्जून नमूद केलीये. आणि प्रवाशांनी नेमकं कसं वागायचं याची हिंटही दिली आहे.त्यामुळेच भलेही तुम्ही इकॉनॉमी क्लासनं प्रवास करत असलात तरी बोर्ड करताना फ्लाइट अटेन्डन्टच्या ‘हॅलो’ला स्मितहास्याच्या रूपात प्रत्युत्तर द्यायला विसरु नका.