शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विमान प्रवास करणार आहात? पण आधी प्रवासी म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार माहित आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:40 IST

विमान प्रवास करताना आपल्याला प्रवासी म्हणून काही अधिकार असतात, हे ब-याच जणांना माहित नसतं. त्यामुळे ‘जाऊ द्या ना, कशाला प्रवासाचा आनंद खराब करायचा’, म्हणून आपण होणा-या गैरसोयींकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता थोडं जागरु क राहिलं, तर प्रवासाच्या आनंदासोबतच आपलं आर्थिक, मानसिक नुकसानही टळतं.

ठळक मुद्दे* कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही तुमचं तिकिट कॅन्सल केलंत, तर तुमचे पैसे लगेचच रिफंड होतात.* डीजीसीएच्या नियमानुसार काही तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं आणि वेळेत उड्डाण करु शकलं नाही, तर विमान कंपनीनं एक तासाच्या आत प्रवाशांची दुसरी सोय करणं बंधनकारक आहे.

 

अमृता कदम 

सणांचा मौसम सुरु झालेला आहे. सणासुदीच्या काळात लोक सुट्टया टाकून मस्तपैकी फिरायला जाण्याचं प्लॅन करत असतात. त्याचाच फायदा घेत विमान कंपन्या प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर्स, सवलती जाहीर करत असतात. पण या आॅफर्समुळं हुरळून न जाता विमान प्रवास करण्यापूर्वी एक प्रवासी म्हणून तुमचे अधिकार जाणून घ्यायला हवेत. नाहीतर सवलतींच्या नावाखाली फसगतच होण्याची शक्यता असते.

 

विमान प्रवास करण्याआधी1. कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही तुमचं तिकिट कॅन्सल केलंत, तर तुमचे पैसे लगेचच रिफंड होतात. डीजीसीएनं (Directorate General Of Civil Aviation)  आपल्या वेबसाइटवर दिलेल्य माहितीनुसार तुम्ही जर कॅश पेमेंट केलं असेल तर तुम्हाला रिफंड लगेचच कॅशनेच मिळतो. जर तुम्ही क्रेडिट  कार्डनं पेमेंट केलं असेल तर तुमचे पैसे सात दिवसांच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून तिकिट बुक करत असाल तर या गोष्टींची माहिती आधीच घ्या. नाहीतर ट्रॅव्हल एजंट तुमची दिशाभूलही करु शकतात.

2. जास्त वजनामुळे जर कोणत्याही प्रवाशाला विमानातून उतरवायचं असेल तर त्यापूर्वी त्याची रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्या प्रवाशाला योग्य ती नुकसान भरपाईही द्यावी लागते. समजा एखाद्या प्रवाशाला काही कारणास्तव विमानात चढूच दिलं गेलं नाही तर त्यालाही भरपाई देणं विमान कंपनीवर बंधनकारक आहे. समजा विमान कंपनीनं भरपाई नाही दिली तर एका तासाच्या आत त्याची दुस-या विमानात सोय करु न देणं गरजेचं असतं.

3. डीजीसीएच्या नियमानुसार काही तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं आणि वेळेत उड्डाण करु शकलं नाही, तर विमान कंपनीनं एक तासाच्या आत प्रवाशांची दुसरी सोय करणं बंधनकारक आहे. विमान कंपनी ही सोय करु शकली नाही तर तिला तिकिटाचे पैसे परत द्यावे लागतात. ब-याच प्रवाशांना ही गोष्ट माहित नसल्यामुळे ते विमान कंपनी सांगेल त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करायला तयार होतात. जर प्रवासी दुस-या कंपनीच्या विमानातून जायच्या तयारीत असेल त्याचीही सोय त्या विमान कंपनीलाच करावी लागते.

 

 

4. तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं, त्याला निर्धारित वेळेपेक्षा एका तासाहून अधिक उशीर झाला आणि दुस-या विमानाची सोय होण्यासाठीही वेळ लागत असेल तर विमान कंपनीनं प्रवाशांची सोय थ्री स्टार हॉटेलमध्ये करणं गरजेचं आहे. शिवाय विमानाची सोय झाल्यानंतर प्रवाशांना हॉटेलपासून एअरपोर्टपर्यंत आणण्यासाठी वाहनाची सोयही करावी लागते.

5. वर सांगितलेल्या गोष्टीचं पालन जर एअरलाइन कंपनीनं नाही केलं तर तुम्ही डीजीसीएच्या वेबसाइटवर 24 तासांत आपली तक्रार नोंदवू शकता. त्यानंतरही जर काही कारवाई नाहीच झाली तर तुम्ही आधी एअरपोर्ट डायरेक्टरकडे लिखित किंवा एसएमएसद्वारे आपली तक्रार दाखल करु शकता.आपल्याला प्रवासी म्हणून काही अधिकार असतात, हे ब-याच जणांना माहित नसतं. त्यामुळे ‘जाऊ द्या ना, कशाला प्रवासाचा आनंद खराब करायचा’, म्हणून आपण होणा-या गैरसोयींकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता थोडं जागरु क राहिलं, तर प्रवासाच्या आनंदासोबतच आपलं आर्थिक, मानसिक नुकसानही टळतं.