शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

परदेशी सहल बजेटमध्ये बसू शकते !

By admin | Updated: April 26, 2017 17:51 IST

आशिया खंडातच अशी ठिकाणं आहेत जी नितांत सुंदर आहेत, सहज बजेटमध्ये बसणारी आहेत आणि जी ‘फिरायला परदेशात जावून आलो’ याचा आनंद देणारीही आहेत.

 

-अमृता कदम

परदेशप्रवास ही काही अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नसली तरी अनेकांसाठी आजही परदेश प्रवास हे स्वप्न असतं. खर्चाचा विचार करून अनेकजण परदेशी फिरायला जाण्याचे बेत पुढे ढकलत राहतात. पण आता तुम्ही परदेशी जाण्याची तयारी खिशाचा विचार न करताही करु शकता. त्यासाठी आशिया खंडातच अशी ठिकाणं आहेत जी नितांत सुंदर आहेत, सहज बजेटमध्ये बसणारी आहेत आणि जी ‘फिरायला परदेशात जावून आलो’ याचा आनंद देणारीही आहेत.

 

* थायलंड

भारतापासून जवळचं परदेशी ठिकाण. परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन. सूर्यकिरणांनी न्हाऊन निघणारे सोनेरी समुद्रकिनारे, सुंदर बौद्ध मंदिरे, महाल अशी ही स्वस्त आणि एकदम मस्त ठिकाणं. शिवाय थाय फूडचं आकर्षणही आहेच! थायलंडचा विमान प्रवास आणि तिथे राहण्याचा खर्चही परवडण्याजोगा आहे. थायलंडमधली मोजकी ठिकाणं बघण्याचं नियोजन केल्यास आठवड्याभराची मस्त ट्रीप नक्कीच होऊ शकते.

 

* श्रीलंका

बरेचसे भारतीय श्रीलंकेला परदेशप्रवास मानणारही नाहीत. आपल्याला राजकीय कारणांमुळेच माहित असलेला श्रीलंका सांस्कृतिकदृष्ट्या आणि निसर्गसौंदर्यानं भारताइतकाच समृद्ध आहे. इथले शुभ्र समुद्रकिनारे, हिरवाई, वेगवेगळी प्राणीसंग्रहालयं आणि युनेस्कोच्या इतर हेरिटेज साइट्स यामुळे .श्रीलंका एकदम परफेक्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. शिवाय तुम्ही जर सी-फूडचे चाहते असाल तर मग श्रीलंका अजूनच उत्तम.

* मलेशिया

‘ट्रूली एशिया’ अशी स्वत:ची अभिमानानं ओळख मिळवणारा मलेशिया खरंतर एका भेटीत पाहून संपणारा देश नाही. वसाहतकालीन स्थापत्य, सदाहरित जंगलं, मोठ्ठाले शॉपिंग मॉल्स म्हणजे मलेशिया प्रवाशांसाठी पर्वणी आहे. मलेशिया परवडण्याजोगं असल्यानं अनेक जोडपी हनीमूनसाठी मलेशियाला पसंती देतात. मलेशियाला गेल्यावर मलाक्कालाही भेट देऊ शकता. मलेशियाची राजधानी क्वालालांपूरपासून अवघ्या दीड तासांच्या अंतरावर असलेलं मलाक्काही निसर्गसौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे.

 

* सिंगापूर

शॉपिंगची क्रेझ  असणाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम ठिकाण म्हणजे सिंगापूर. मुंबईप्रमाणेच कायम धावत राहणार हे शहर. समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, आधुनिक स्थापत्यशैलीचे अनेकविध आविष्कार, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ हे सिंगापूरचं वैशिष्ट्य आहे. अगदी चार-ते पाच दिवसांची मस्त ट्रीप होऊ शकते सिंगापूरची. पण हो, यासाठी तुम्हाला तुमची ट्रीप अ‍ॅडव्हान्समध्येच प्लॅन करावी लागेल. कारण ऐनवेळी ठरवलं तर मात्र सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाईटचा खर्च महागात जाईल.

*इंडोनेशिया

पाचूचा देश म्हणूनच इंडोनेशियाची ओळख आहे. जावा, सुमात्रा, बाली ही इंडोनेशियातली प्रमुख आकर्षणं. समुद्रकिनारे, सदाहरित जंगलांसोबतच इंडोनेशियामध्ये हिंदू संस्कृतीच्याही अनेक खुणा पहायला मिळतील. इथली काही मंदिरंही प्रसिद्ध आहेत. शिवाय इथले ज्वालामुखी हेदेखील पर्यटकांना खुणावत असतात. * भूतान जगातले देश भलेही आपला विकास जीडीपीमध्ये मोजत असतील. पण भूतानमध्ये तो हॅपीनेस इंडेक्समध्ये मोजला जातो. आनंदी लोकांचा हा छोटासा शेजारी देश. बौद्धधर्म आणि संस्कृतीच्या खुणा इथे पावलोपावली पहायला मिळतात. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश असल्यानंं इथे ट्रेकिंग आणि इतरही अडव्हेंचर स्पोर्ट्सचे आॅप्शन मिळतील. जर वेळ असेल आणि बजेट वाढवण्याची तयारी असेल तर भूतानच्या ट्रीपमध्ये ईशान्य भारतातील राज्यंही क्लब करु शकता.

*नेपाळ

नेपाळमध्ये गेल्यावर आपल्याकडच्या कॅमेऱ्याला अजिबात विश्रांती मिळणार नाही. भारताच्या सीमेलगत असलेला हा देश पाहणाऱ्याला कदाचित भारताचंच एक्सटेन्शन वाटू शकतं. हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा, मंदिरं, प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या खुणा, नेपाळमधलं तुमचं वास्वव्य नक्कीच आनंददायी होतं. नेपाळची ट्रीपही उत्तरेकडल्या एखाद्या राज्यासोबत क्लब करु शकता. आशियातले हे छोटे देश तुम्हाला बजेट ट्रॅव्हलचं समाधान तर देतातच पण त्यापेक्षाही तुम्हाला मिळतात अविस्मरणीय आनंदाचे क्षण जे अमूल्य असतात. .