शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावरील अति उत्साहामुळे तुमचं घर होऊ शकतं साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:18 IST

पिकनिकला जाताना फोटोपासून ते आपलं लोकेशन जाहीर करण्यापर्यंत काही गोष्टींवर लावा लगाम

ठळक मुद्देप्रवासाला गेल्यानंतर आपल्या सगळ्याच गोष्टी सोशल मिडियावर लगेच शेअर करू नका.अनेक भामटे अशाच माहितीच्या शोधात असतात. आपण बाहेरगावी आहोत म्हटल्यांवर त्यांच्यासाठी मग आयताच चान्स..थोडा धीर धरा आणि पिकनिकहून आल्यानंतर मग ते फोटो, तिथलं प्रवासवर्णन शेअर करा. आम्ही आता घरी परतलो आहोत याचा उल्लेख करायला मात्र विसरू नका.

- मयूर पठाडेआपण प्रवासाला जातो. खूप उत्साह असतो आपल्याला. फोटो तर किती काढू आणि किती नको असं आपल्याला होतं. बरं काढले, तर काढले, ते केव्हा एकदा सोशल मिडियावर टाकून सगळ्यांना शेअर करतो असं आपल्याला होतं. अख्ख्या फॅमिलीचे फोटो आपण शेअर करतो. फोटो फारच छान असतात. कारण लगेच आपल्या परिचितांकडून त्याची दादही आपल्याला मिळते. आपणही मग हा फोटो कुठला, कोणत्या ठिकाणी काढलेला.. तिथलं वातावरण.. कशी मज्जा आली, येतेय.. याचं रसभरीत वर्णन आपण तिथे करतो. आत्ता आपण कुठे आहेत ही अ‍ॅडिशनल माहिती देखील पुरवतो. उत्साह आणखीच दांडगा असेल, तर अजून किती दिवस आम्ही सहकुटुंब सहलीला आहोत, हेदेखील कळवून टाकतो..आता इतकी सारी माहिती तिही इत्यंभूतपणे हातात ‘तयार’ मिळाल्यावर मग आणखी काय पाहिजे?..अनेक भामटे अशाच माहितीच्या शोधात असतात. आपण बाहेरगावी आहोत म्हटल्यांवर त्यांच्यासाठी मग आयताच चान्स..दिवाळीच्या काळात आणि सुटीच्या दिवसांत, घरी कोणी नसताना अख्खं घर साफ करून नेल्याच्या अनेक घटना दरवर्षी प्रत्येक ठिकाणी घडतात. त्यामुळे तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर अवश्य जा, पण आपली अशी बित्तम्बातमी सोशला मिडियावर चुकूनही शेअर करू नका. समजा तुम्हाला ही माहिती, तुमचे इतके उत्तम फोटो आपल्या परिचितांबरोबर शेअर करायचेच असतील, तर थोडा धीर धरा आणि पिकनिकहून आल्यानंतर मग हे फोटो शेअर करा. आम्ही आता घरी परतलो आहोत याचा उल्लेख करायला मात्र विसरू नका. या प्रवासाचं रसभरीत वर्णनही आता तुम्ही करू शकता. पण हे सारं आपल्या उत्साहाला थोडा आवर घालून केलं तर नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही.