शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

पहिल्यांदा ट्रेकला जाताना नेमकं वाटतं काय?

By admin | Updated: April 12, 2017 15:08 IST

पालघरमधील तांदुळवाडीच्या डोंगरानं एका दोस्ताला दाखवलेला एक नवा रस्ता

-चेतन जोगट्रेकिंगची विशेष आवड, आकर्षण होतं पण त्यासाठी फारसा वेळ कधी देता आला नाही. मात्र व्हाट्स अ‍ॅपवर मयुर तेंडुलकर नावाच्या मित्रानं त्याच्या ट्रेकिंग ग्रूपमध्ये अ‍ॅड केलं. ट्रेकिंगच्या ग्रुपवर आल्यावर तिथे आधीपासून असलेल्या जुन्या मंडळींच्या ओळखीने बरीच उत्सुकता ताणली गेली.

 

अशातच मयुरने तांदुळवाडी ट्रेकला जाण्याचं जाहीर केलं. मला मनातून खूप आनंद झाला की मी आज लहानपणापासून जे स्वप्न बघत आलो ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. होळीच्या दिवशी जाण्याचे ठरले. त्या दिवसा आधी मी मयुरची सदिच्छा भेट घेऊन बरीचशी माहिती काढली. तो त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकला नाही. तेव्हा ग्रुपमध्ये असे वातावरण झाले की ट्रेक एकट्याने कसा पार पाडायचा. मग ठाणे येथे राहणारे गजानन नामजोशी व पुणे येथून अनिरुद्ध जोशी हे दोघे तयार झाले माझ्यासोबत येण्यासाठी.

 

अखेर तो दिवस उजाडला ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. मी भुईगावहुन बसने नालासोपारा स्टेशनवर आलो. तिथून नालासोपारा ते सफाळे रिटर्न तिकीट काढून लगेच आलेल्या विरार लोकलने विरार स्टेशन गाठले. तिथे गजानन आणि अनिरुद्ध दोघे आधी हजर होते. मग वेळ न घालवता आम्ही डहाणू लोकल ने सफाळे ला पोचलो. सफाळेला बाहेर पडून एका रेस्टॉरन्टमध्ये नाश्ता केला आणि तांदुळवाडीला जाणारी बस कुठून आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर आलो. मार्केटमधून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या उजवीकडून सरळ चालत गेल्यावर रिक्षा स्टॅन्ड आहे तिथे गेलो. स्पेशल कम शेअर रिक्षा घेऊन आम्ही तांदुळवाडीच्या पायथ्याशी आलो. तेव्हा जवळ जवळ ११.३० वाजले होते.

 

दुपारच्या त्या वेळी चारही बाजूला रखरखाट आहे. पायथ्याशी तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे आॅफिस आहे. तिथून आत चालत निघालो. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तोच रस्ता धरून पुढे चालत राहिलो. वाटेत स्थानिक मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांना विचारून सरळ रस्ता पकडला आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. माझा हा पहिलाच ट्रेक असल्यामुळे मला फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे मी अंदाजे ५० पायऱ्या चढून जाताच मला दम लागला. मी थांबलो तेव्हा गजानन आणि अनिरुद्ध बरेच पुढे गेले होते. त्यांना थांबायचं इशारा करून हळूहळू ते होते तिथपर्यंत पोहोचलो. जरा विश्रांती घेऊन पाणी पिऊन परत चढायला सुरुवात केली.

 

साधारण पाऊण तासाच्या चढाईनंतर पुन्हा एकदा थांबलो. आसपासचे काही फोटो काढले आणि नव्या दमाने पुढील चढाईला सुरुवात केली.त्यानंतरही अजून अर्ध्या तासाने ज्याला बेस कॅम्प म्हणता येईल अशा सपाटीवजा जागेत आलो. तिथून तांदुळवाडीचे टोक पाहताना अतिशय सुंदर वाटत होते. मग तिथे एका डेरेदार वृक्षाखाली बसून फराळ, फोटोसेशन केलं.फराळ खाऊन ताजेतवाने झालेले आम्ही सगळे पुढच्या चढाईसाठी सज्ज होतो. तिथून लाकडे तोडून घेऊन जाणाऱ्या स्थानिक गावकऱ्याला पुढील रस्ता विचारला. त्याने सांगितले की ही दोन्ही बाजूला दगड रोवून केलेली पायवाट गडाच्या माथ्यापर्यंत घेऊन जाईल. त्याप्रमाणे मजल दरमजल करीत गप्पा मारीत पुढे चालत राहिलो. साधारण तासाभराच्या पायपीटीनंतर सावलीखाली बसून फलाहार केला आणि पुन्हा चढाई सुरू केली.

 

तिथून पाऊण तास चढून गेल्यावर आम्ही गडाच्या माथ्याजवळ पोचलो. मध्ये वाटेत एक पडझड झालेला पण कामचलाऊ पाण्याचा हौद पाहिला. तसेच म्हातारीच्या केसाप्रमाणे दिसणारे गवत पाहिले. तिथून गडाचा माथा अगदीच जवळ होता. वीस मिनिटाच्या पायपीटीत आम्ही माथ्यावर पोचलो. वर माथ्यावरून दिसणारे तांदुळवाडी गाव आणि परिसर तसेच वैतरणा नदी याचे विहंगम दृश्य पाहून सर्व थकवा कुठच्या कुठे पळून गेला.

 

मग आम्ही एक सुळक्यावजा दगडाच्या जवळ जाऊन तिथे आधीपासून रोवून ठेवलेल्या झेंड्याला हात लावून फोटो काढले. पाणी वगैरे पिऊन जरा तरतरीत झाल्यावर परतीच्या मार्गाला लागलो. उतरताना काही ठिकाणी मध्ये येणार्या झाडांच्या फांद्यांमुळे खरचटले तरी त्याची कोणाला पर्वा नव्हती.एकामागोमाग एक उतरत होतो आम्ही सगळे. अशा वेळी एकी हीच कामी येते. कारण ज्या मार्गाने आम्ही चढत गेलो त्यातील गडाच्या माथ्यापासूनचा अर्धा टप्पा आम्ही परतीच्या प्रवासात पार केला, पण पुढे वाट चुकली आणि आमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले कि आता काय करायचे खाली कसे उतरायचे? पण गजानन ने आम्हाला धीर देऊन काही मार्ग दिसतोय का पाहतो असे सांगितले. तो म्हणाला,‘ अरे, असे प्रसंग येतच असतात.त्यामुळे खचून न जाता त्यातून बाहेर कसे पडता येते याकडे लक्ष केंद्रीत करा.’ त्याने हळू हळू पुढे होत रस्ता शोधून काढला आणि आम्हाला मागोमाग येण्यासाठी इशारा केला. आम्ही दोघे तिथपर्यंत गेलो रस्ता पाहायला, पण तो अतिशय धोकादायक उतरणीचा होता. मी थोडा घाबरलो होतो.पण अनिरुद्ध आणि गजाननने धीर दिल्यामुळे तयार झालो. एक तासाच्या खडतर उतरणीनंतर आम्हाला एक मंदिर दिसलं, पण ते आम्ही उभे होतो तिथून खूप दूर होतं.

 

आता थोडंच उतरायचं असे मनाशी म्हणत मंदिरापर्यंत पोचलो. तिथे पायरीवर बसून दम टाकला तेव्हा जरा बरं वाटलं. वाट चुकल्यामुळे या उतरणीने उतरताना माझा पाय अनेकदा मुरगळला होता. त्यामुळे दोन्ही पाय खूप दुखत होते. मंदिराच्या पायरीवर बसून थोडं बरं वाटत होत. मनाचा हिय्या करून खाली उतरलो. खाली एक बोअरिंगचे पाणी गावकरी बायका भरत होत्या. तिथले बोअरिंगचे थंड पाणी पिऊन तरतरीत झाल्यावर परतीच्या बसची वाट बघत थांबलो. आणि निघालो घराकडे..पहिल्यांदा ट्रेकला गेलो..

 

आणि मग कळलं ही ट्रेकची नशा नेमकी असते काय?