शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

प्रवासाची बॅग भरताना अजूनही तुमची धांदल उडते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:41 IST

या चार गोष्टी फक्त करा आणि व्हा निश्चिंत. कायमस्वरुपी!..

ठळक मुद्देज्या वेळी आपण प्रवासाला जाणार आहोत, त्यावेळचं वातावरण कसं आहे ते अगोदर पाहा.प्रवासाची आपली यादीच तयार हवी.उदाहरणार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फूड, पर्सनल केअर, अत्यावश्यक गोष्टी.. त्या त्या मुद्यापुढे फक्त पॉर्इंटरमध्ये आपल्याला जे जे सोबत घ्यायचं आहे ते लिहित जायचं.

- मयूर पठाडेप्रवासाला जाण्याचा आपला अनुभव कसा आहे?.. म्हणजे आपण सारेच जण कुठल्या ना कुठल्या कारणानं प्रवास करतो. कधी तो पिकनिक म्हणून आपल्या कुटुंबासोबत केलेला असतो, कधी आॅफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी केलेला असतो किंवा लग्न, सण, समारंभ.. यासाठी केलेला प्रवास.. काहीही असो.. आणि कितीही आधी ते आपल्याला माहीत असो, या प्रवासाची तयारी आपण कधी सुरू करतो?..बहुतांश अनुभव असा आहे, आपला प्रवास कितीही प्रिप्लान्ड असला, तरीही प्रवासाची बॅग भरण्याची तयारी मात्र आपण बºयाचदा अगदी ऐनवेळी करतो.. काही जणांना तर आता निघायचंय, पण तरीही ते आपली बॅग भरतच असतात. हे राहिलं, ते राहिलं.. शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर जे काही भरलं असेल बॅगमध्ये, ते घेऊन निघतात...खरं तर प्रवासाला जाताना अशी ऐनवेळची धांदल टाळता येणं सहज शक्य आहे.. त्यासाठी काही गोष्टी मात्र मनापासून करायला हव्यात. त्यासाठी फार वेळ लागत नाही, पण ऐनवेळची गडबड मात्र त्यामुळे टळेल.ऐनवेळची गडबड टाळण्यासाठी काय कराल?१- सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळी आपण प्रवासाला जाणार आहोत, त्यावेळचं वातावरण कसं आहे ते पाहाणं..२- म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा.. त्यानुसार आवश्यक त्या गोष्टी सोबत घेणं.३- आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासाची आपली यादीच तयार हवी.४- ही यादीही विशिष्ट क्रमानं असावी. उदाहरणार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फूड, पर्सनल केअर, अत्यावश्यक गोष्टी.. अशा प्रकारे. मग त्या त्या मुद्यापुढे फक्त पॉर्इंटरमध्ये आपल्याला जे जे सोबत घ्यायचं आहे ते लिहित जायचं.४- खरं तर ही लिस्ट कायमस्वरुपीही तयार करून ठेवता येईल. ज्या ज्या वेळी प्रवासाला जायचं असेल, त्यावेळी फक्त ही लिस्ट बघायची आणि त्याप्रमाणे आपलं सामानं सोबत घ्यायचं.बघा, अगदी ऐनवेळी जरी तुम्हाला कुठे जायचं असलं तरी ही लिस्ट अगदी देवदुताप्रमाणे कामाला येईल.