शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या सहलीचे फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकायचे आहेत का? मग या टिप्स वाचाच! इन्स्ट्राग्रामवर टाकण्यासाठी फोटो कसे हवेत हे या टिप्स वाचूनच कळेल!

By admin | Updated: June 8, 2017 18:11 IST

फेसबुक आणि स्पेशली इन्स्टाग्रामवर तुमचे प्रवासाचे अनुभव फोटो रुपानं शेअर करणार असाल तर या टीप्स आवर्जून वाचा आणि वापरून पाहा.

- अमृता कदमप्रवासाहून परत येताना तिथे काढलेल्या फोटोंच्या रूपातून आपण खूप सारे आनंदाचे क्षण आणि आठवणी सोबत घेवून येत असतो. . फोटोंच्या रूपानं हा आनंद आपल्यासोबत कायम राहतो. आता तर सोशल मीडियामुळे आपण आपले प्रवासातली धमाल मस्ती, मेमोरेबल क्षण चटकन, अगदी त्याचक्षणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करु शकतो. तुम्हीही जर ट्विटर, फेसबुक आणि स्पेशली इन्स्टाग्रामवर तुमचे प्रवासाचे अनुभव फोटो रुपानं शेअर करणार असाल तर या टीप्स आवर्जून वाचा आणि वापरून पाहा. इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो क्लिक करायला तुम्हाला त्यांची नक्की मदत होईल. आणि तसंही केवळ स्वत:च्याच वेगवेगळ्या पोझेस शेअर करण्यात काय मजा? इन्स्टाग्रामवर तुमच्या फोटोंच्या रूपानं अख्खा ट्रॅव्हललॉगच शेअर करता येतो पण त्यासाठी ते फोटो अधिक उत्तम कसे येतील, फोटोच आपल्या प्रवासाबद्दल कसे बोलतील यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतातचं!

 

   इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो क्लिक करताना.. 1. प्रकाश आणि सावलीचं भान ठेवा- तुमचे प्रवासाचे फोटो काढताना नैसर्गिक उजेडाचं आणि सावलीचं भान बाळगा. एडिटिंंगअ‍ॅप वापरु न तुमच्या फोटोंना आकर्षक बनवण्यापेक्षा नॅचरली काढलेले फोटो अधिक आॅथेंटिक तर वाटतातच पण त्याचबरोबर तुम्ही जिथे फिरायला गेला आहात त्याठिकाणंच खरखुरं सौंदर्यही त्या फोटोंमध्ये कॅप्चर होतं. त्यामुळे प्रवासाला निघण्याच्या आधी तुमच्या कॅमेऱ्यातले फीचर्स माहित करु न घ्या आणि फोटोग्राफीची लाइट-शॅडोतली गंमत समजून फोटो काढा. 2. तुमच्या फोटोंना डेप्थ देण्याचा प्रयत्न करा. हो हे फोटोग्राफीतलं आर्टिस्टिक स्किल आहे, पण थोड्याफार प्रयत्नानं ते तुम्हाला नक्कीच जमू शकतं. त्यामुळे तुमचे फोटो जास्त जिवंत वाटतात. 3. केवळ सेल्फी काढत राहण्यापेक्षा तुम्ही जिथे फिरायला गेला आहात तिथल्या स्थानिक गोष्टींचं संस्कृतीचंही प्रतिबिंब तुमच्या फोटोंमध्ये दिसेल याची काळजी घ्या. तिथला बाजार, रस्ते, खाद्यपदार्थ आणि तिथले लोकंही तुमच्या फोटोंमध्ये येऊ द्या. तुमच्या फोटोंनाच तुमची ट्रॅव्हल डायरी बनून बोलू द्या. 4. लँडस्केप फोटोंना उठाव तेव्हाच येतो जेव्हा त्यामध्ये व्यक्तीही असतील. त्यामुळे लँडस्केप फोटो काढण्याचा विचार करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 5. तुम्ही जेव्हा समुद्रसपाटीपासून उंचावर असाल तर तिथल्या निसर्गसौंदर्याचे फोटो काढताना एरियल अँगल्सचा वापर आवर्जून करा. तुम्हाला तुमच्या फोटोचा हॉरिझन अधिक रुंद मिळतो आणि फोटोमध्येही निसर्गसौंदर्य अधिक खुलून येतं. 6. तुमच्या फोटोंसोबत वेगवेगळे प्रयोग करायला अजिबात कचरु नका. स्केल्सचा विचार करून फोटो काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते फोटो पाहताना तुमचा अनुभव पुन्हा एकदा जिवंत होईल.