शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

फुकट ‘वायफाय’च्या हव्यासाचे बळी ठरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:15 IST

सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरताना घ्या काळजी..

ठळक मुद्देकाही सार्वजनिक ठिकाणी ‘वायफाय’ फुकट मिळतंय म्हणून अनेक जण त्याचा वारेमाप वापर करतात, पण असं करणं फारच धोकादायक ठरू शकतं.आपल्या मोबाईलमधील अतिशय महत्त्वाची आणि गुप्त माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याची आणि त्याचा दुरुपयोग केला जाण्याची मोठीच शक्यता असते.आपला मोबाईल कायम पासवर्ड प्रोटेक्टेड असला पाहिजे आणि त्यावर ट्रॅकिंग टुल्स असणंही फायदेशीर ठरू शकतं.

- मयूर पठाडेदिवाळीच्या आता अनेकांना सुट्या लागतील. काही जण दिवाळीनिमित्त खास सुट्याही घेतील. फिरायला जातील. असंही आता दिवाळीच्या काळात फिरायला जाण्याचा ट्रेंड बºयापैकी वाढला आहे. मात्र बाहेरगावी जाताना काही गोष्टींची काळजी अवश्य घेतली पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी, पण तुमची चिंता त्यामुळे खूपच कमी होईल.बºयाचदा ‘फुकट ते उत्तम’ अशी आपली समजूत असते. त्यामुळे फुकट काही मिळत असलं की लगेच त्यावर आपल्या उड्या पडतात. ‘वायफाय’ हे त्याबाबतचं एक उत्तम उदाहरण. प्रवासात, स्टेशनवर फुकट मिळतंय म्हणून अनेक जण आपापले मोबाईल काढून त्यावर तासन्तास किंवा जितकं म्हणून नेट वापरता येईल तितकं वापरण्याचा प्रयत्न करतात, पण असं करणं फारच धोकादायक ठरू शकतं.सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं नेट वापरण्यामुळे हॅकिंगला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आपल्या मोबाईलमधील अतिशय महत्त्वाची आणि गुप्त माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याची आणि त्याचा दुरुपयोग केला जाण्याची मोठीच शक्यता असते. आजवर अशाच माध्यमातून हॅकर्सनी मोठा डल्लाही मारला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फुकटच्या आमिषांपासून दूर राहिलेलं केव्हाही बरं.आपला मोबाईल कायम पासवर्ड प्रोटेक्टेड असला पाहिजे आणि त्यावर ट्रॅकिंग टुल्स असणंही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.केवळ मोबाइलच नाही, जी कुठली इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण वापरतो, लॅपटॅप, टॅब.. इत्यादि या साºयांसाठीच पासवर्ड अतिशय स्ट्रॉँग असायला हवा आणि सातत्यानं तो बदलतही राहायला हवा.त्यामुळे आपली महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याची आणि त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता बºयाच अंशी कमी होते.