शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

​चला, समुद्र किनारी फिरुया..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 18:41 IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा, समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...

-Ravindra Moreलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा,  समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त  हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. हा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी फिरणे, वेळ घालविणे कोणाला आवडणार नाही. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...* राधानगर समुद्र किनारा, अंदमान   शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणाऱ्या या समुद्र किनाऱ्याचा टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून गौरव केला आहे. आहे. निसगार्चं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.      * कोवालम समुद्र किनार, केरळ बहुतेक पर्यटक आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घालविण्यासाठी या समुद्र किनारी भेट देतात. त्रिवेंद्रमपासून १६ किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम बीच आहे. विशेष म्हणजे लाइट हाऊस हे या बीचचं खास आकर्षण आहे. शिवाय किनाऱ्यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनाऱ्याचे खास वैशिष्ट्ये आहे.  * बंगाराम बीच, लक्षद्वीप  चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनाऱ्याचं वैशिट्ये. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनाऱ्याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो. * तारकर्ली समुद्र किनारा, महाराष्ट्र कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी २० फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या.* मेरारी बीच, केरळ केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनाऱ्याची वैशिट्ये आहेत.