शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बाइकिंगचा थरारक अनुभव घ्यायचाय?; तर चूलगिरी ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 15:53 IST

जर तुम्हाला बाईक रायडिंगची आवड असेल आणि तुम्ही कधीकधी खतरों के खिलाडी होत असाल तर, तुम्ही एकदा तरी चूलगिरीला भेट द्यावी. चूलगिरीला बाइक रायडिंगचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल.

जर तुम्हाला बाईक रायडिंगची आवड असेल आणि तुम्ही कधीकधी खतरों के खिलाडी होत असाल तर, तुम्ही एकदा तरी चूलगिरीला भेट द्यावी. चूलगिरीला बाइक रायडिंगचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल. डोंगरांमधील रस्त्यांमध्ये बाइक चालवण्याचा अनुभव अत्यंत सुंदर असेल. त्यानंतर डोंगरावर पोहोचल्यानंतर शांत आणि सुंदर वातावरणामध्ये असलेलं जैन मंदिर पाहता येईल. या ठिकाणी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी अनेक लोक पोहोचतात. 

चूलगिरी येथे असलेलं एक दिगंबर जैन मंदिर असून ते आपल्या वेगळ्या वास्तूकलेसाठी ओळखलं जातं. येथे भगवान महावीरांची 21 फुटांची उंच प्रतिमा स्थापन केलेली आहे. परत्येक वर्षी मे महिन्यामध्ये येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराचे दर्शन तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेऊ शकता. लश्रात ठेवा, येथील रस्ता डोंगराळ असून जंगलाने वेढलेला असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळनंतर येथे जाण्याची परवानगी नाही. 

जर बाईक राइड करायची नसेल तर, 

जयपूर शहरापासून चूलगिरीला पोहोचण्यासाठी तुम्हाला घाटातील गुणी सुरंगच्या माध्यमातून सफर करावं लागेल. येथून अगदी आरामात तुम्ही चूलगिरीला पोहोचू शकता. कारण हे ठिकाण शहराच्या बाहेरील भागामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला गरज असेल तर येथे पोहोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची मदत घेऊ शकता. परंतु येथे तुम्हाला डोंगरांमधील रस्त्यांवर तयार करण्यात आलेल्या रोडवरून प्रवास करावा लागेल. तुम्ही गरज असल्यास पायऱ्यांचाही वापर करू शकता. परंतु डोंगरावर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळपास एक हजार पायऱ्या चढाव्या लागतील. 

कसे पोहोचाल चूलगिरी?

चूलगिरीच्या डोंगररांगा जयपूर-आग्रा रोड म्हणजेच, एनएच-11 वर स्थित आहे. जर तुम्ही जयपूरमध्य फिरण्याचा प्लॅन करत असाल तर चूलगिरीलाही नक्की भेट द्या. किल्ले, महालांपेक्षाही वेगळं रायडिंग आणि रोमांचंक ट्रिपचा अनुभव अजिबात मिस करू नका. या डोंगररांमधील रस्ते पार करणं जेवढं रोमांचकारी आहे, तेवढेच भारी येथील डेस्टिनेशन्स आहेत. जयपूरच्या सिंधी कॅम्प बस स्टॉपपासून चूलगिरी जवळपास 12 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण जवळपास 15 किलोमीटर आणि जयपूरच्या सांगानेर एअरपोर्टपासून चूलगिरी जवळपास 18 किलोमीटर आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन