शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

बॉलिवूडमुळे भारतातील ही 10 ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाली आहेत. ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत आणि परवडणारीही आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 18:50 IST

भारतात अशी दहा ठिकाणं आहेत जी बॉलिवूडनं लोकप्रिय केलेली पर्यटनस्थळं आहेत. ही ठिकाणं प्रवासाच्या दृष्टिनंही सोयीची आणि बजेटमध्येही बसणारी आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत जर कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर या ठिकाणांचा विचार करायला हरकत नाही.

ठळक मुद्दे* अग्वाडा फोर्ट. ‘दिल चाहता है’ मधलं भिंतीवरून समुद्राकडे पाहत बसलेल्या तीन मित्रांचं ते प्रसिद्ध दृश्य अग्वाडा फोर्टवरचंच. हा सतराव्या शतकात पोर्तुर्गीजांनी बांधलेला किल्ला आजही उत्तम स्थितीत आहे.* अगदी सत्तरच्या दशकापासून मनाली हे बॉलिवूडचं लाडकं ठिकाण आहे. इथली हिमालयाची शिखरं, सूचीपर्णी वृक्षांची जंगलं, हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी, खळखळत वाहणा-या नद्यांनी कायमच बॉलिवूड आणि पर्यटकांना भुरळ घातली आहे.* लडाखचा पेंगोंग लेक जगातल्या सर्वांत सुंदर तलावांपैकी आहे. बर्फाने वेढलेल्या पर्वतरांगांमध्ये निळ्याभोर पाण्याचा हा तलाव थ्री इडियट्सच्या शेवटच्या दृश्यात पाहायला मिळतो.* जब मी मेट, हायवेमधला रोहतांग पासवरचा प्रवास पाहिल्यानंतर अनेकांची पावलं इकडं वळायला लागली आहेत. मनालीपासून 51 किलोमीटर उंचावर हा रस्ता आहे.

 

- अमृता कदम.सर्वसामान्यांवर प्रभाव टाकणारं सर्वांत महत्त्वाचं माध्यम म्हणजे चित्रपट. म्हणूनच बॉलिवूड स्टार्सच्या फॅशनचं, त्यांच्या शैलीचं, त्यांच्या स्टाइल-स्टेटमेंटचं अनुकरण चटकन होतं. अजून एक गोष्ट आहे जी बॉलिवूडनं सामान्यांच्या स्वप्नांच्या आवाक्यात आणून ठेवली आहे ते म्हणजे पर्यटन. स्टुडिओमधून बाहेर पडून हिंदी चित्रपटांचं शूटिंग वेगवेगळ्या सुंदर ठिकाणी व्हायला लागलं आणि थोड्याच काळात ही ठिकाणं पर्यटकांसाठीही आकर्षणाची केंद्र बनायला लागली. भारतात अशी दहा ठिकाणं आहेत जी बॉलिवूडनं लोकप्रिय केलेली पर्यटनस्थळं आहेत.

1. अग्वाडा फोर्ट

रंगीला, दिल चाहता है, गोलमाल, धूम या चित्रपटांमध्ये काय समान आहे? तर गोव्यातली अत्यंत सुंदर अशी ठिकाणं. त्यांपैकीच एक म्हणजे अग्वाडा फोर्ट. ‘दिल चाहता है’ मधलं भिंतीवरून समुद्राकडे पाहत बसलेल्या तीन मित्रांचं ते प्रसिद्ध दृश्य अग्वाडा फोर्टवरचंच. हा सतराव्या शतकात पोर्तुर्गीजांनी बांधलेला किल्ला आजही उत्तम स्थितीत आहे. किल्ल्यावरचं चारमजली उंच लाइटहाऊसही आहे. पूर्वीच्या काळी इथे अनेक जहाजं नांगरली जायची. या किल्ल्यावरच्या तटबंदीवरून समोरचा गरजणारा समुद्र दिसतो. इथल्या भिंतीवर बसून सूर्यास्ताचा आनंद घेणं हा एक सुखद अनुभव आहे

 

2.मनालीअगदी सत्तरच्या दशकापासून मनाली हे बॉलिवूडचं लाडकं ठिकाण आहे. इथली हिमालयाची शिखरं, सूचीपर्णी वृक्षांची जंगलं, हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी, खळखळत वाहणा-या नद्यांनी कायमच बॉलिवूड आणि पर्यटकांना भुरळ घातली आहे. अगदी राजेश खन्नाच्या आप की कसमपासून रणबीर-दीपिकाच्या ये जवानी है दिवानी’पर्यंत नायक-नायिकेच्या रोमान्ससाठी बॉलिवूडला मनालीचीच आठवण आलीये. या बॉलिवूड कनेक्शनमुळं आपल्या हनीमूनसाठी अनेक जोडपी मनालीला पसंती देतात.

 

3. रोहतांग पासजब मी मेट, हायवेमधला रोहतांग पासवरचा प्रवास पाहिल्यानंतर अनेकांची पावलं इकडं वळायला लागली आहेत. मनालीपासून 51 किलोमीटर उंचावर हा रस्ता आहे. यापूर्वी काही थ्रील, साहसी पर्यटनाची आवड असलेले पर्यटक, बायकर्स रोहतांग पासचा प्रवास करायला पसंती द्यायचे. पण आता सर्वसामान्य पर्यटकही आवर्जून हा प्रवास करतात. एका बाजूला हिमालयाच्या उंच रांगा आणि दुस-या बाजूला खोल दरी, त्यामधून जाणारा हा वळणावळणाचा रस्ता. हा लाइफटाइम एक्सपीरिअन्स घ्यायला पर्यटक उत्सुक असतात.

 

 

4. उदयपुर पॅलेस

शाही थाटाचा परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर उदयपूर पॅलेससारखं दुसरं ठिकाण नाही. त्यामुळेच अनेक फिल्म मेकर्स उदयपूर पॅलेसकडे धाव घेतात. यादें, ये जवानी है दिवानी, राम लीला यांसारख्या फिल्मचं शूटिंग याच उदयपूर पॅलेसमध्ये झालंय. उदयपूर पॅलेस जसा आज शाही विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच प्रसिद्ध आहे मस्त एक्झॉटिक व्हेकेशनसाठीही. फक्त आपला खिसा सैल करायची तुमची थोडी तयारी हवी!

 

 

5. मुन्नार

केरळमधल्या सर्वांत सुंदर हिलस्टेशन्सपैकी एक म्हणजे मुन्नार. चेन्नई एक्सप्रेसमधल्या एका गाण्यांत शाहरु ख-दीपिकाच्या रोमान्समध्ये आपल्याला मुन्नार दिसतं. बॅक वॉटर्स, मैलो न मैल पसरलेले चहाचे मळे, थंड हवा यामुळे मुन्नार दक्षिण भारतातलं सर्वांत सुंदर आणि रोमॅण्टिक डेस्टिनेशन आहे. 

6. पेंगोंग लेकलडाखचा पेंगोंग लेक जगातल्या सर्वांत सुंदर तलावांपैकी आहे. बर्फाने वेढलेल्या पर्वतरांगांमध्ये निळ्याभोर पाण्याचा हा तलाव थ्री इडियट्सच्या शेवटच्या दृश्यात पाहायला मिळतो. पेंगोंग लेकपासून चीनची सीमाही दिसते. भारताच्या अगदी शेवटच्या टोकावर असल्यामुळे इथे पर्यटकांची महामूर गर्दीही दिसत नाही. इथं सगळ्या जगापासून लांब येऊन तुम्हाला स्वत:मध्येच डोकावून बघायची एक संधी मिळते.

7. मरीन ड्राइव्ह

मुंबईमधलं मरीन ड्राइव्ह दाखवलं नाही, अशा फार कमी हिंदी फिल्म असतील. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट सिनेमापासून आजपर्यंत अनेक चित्रपटातून ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण दिसलं आहे. बाहेरगाववरु न येणारे पर्यटकच नाही तर मुंबईकरांनाही मरीन ड्राइव्हवर येऊन आपले रोजचे ताणतणाव विसरायला आवडतं. रात्री दिव्यांनी उजळून निघालेल्या मरिन ड्राइव्हर बसून समुद्राकडे शांतपणे पाहत राहाणं यासारखा आनंद नाही.

 

8. इंडिया गेट

भारताच्या राजधानीमधलं हे ठिकाण. भारताची सुरक्षा करताना शहीद झालेल्या जवानांची नावं इथं लिहली आहेत. शिवाय या जवानांच्या स्मरणार्थ इथे एक अखंड ‘अमर जवान’ ज्योत तेवत राहाते. दिल्लीतले प्रशस्त रस्ते, इंडिया गेट आणि रस्त्याच्या कडेला असलेली हिरवळ. रंग दे बसंती, दिल्ली, 3 थ्री इडियट्स, रॉकस्टारमध्ये इंडिया गेटच्या या नजा-याचं दर्शन ब-याचजणांनी घेतलंय. पण सुटीच्या दिवशी इंडिया गेट लोकांचा जो मेळा लागतो तेव्हा इथल्या माहौलमध्ये जिवंतपणा येतो.

 

 

9. शिमल्याचा माल रोड

हिमाचलची राजधानी शिमला ही आता केवळ चित्रपटांचच नाही तर हिंदी मालिकांच्या शूटिंगचंही स्थळ बनलं आहे. त्यातही इथला माल रोड तर खरेदीचं वेड असणा-यासाठी खास आवडीचं ठिकाण. माल रोडवर फार काही खास गोष्टी मिळतात असं नाही. पण आपण ज्या ठिकाणी फिरायला गेलो होतो, तिथून काहीतरी घेऊन आल्याचं समाधान पर्यटकांना मिळतं. पण तुमचा खिसाही तेवढाच हलका होतो. 

 

10. जयपूर

‘पिंक सिटी’ जयपूरमधल्या अनेक ऐतिहासिक वास्तू चित्रपट आणि मालिकांमुळे लोकांना माहित झाल्या आहेत. ‘जोधा अकबर’ चित्रपट आणि मालिकेमुळे आमेरचा किल्ला, ‘रंग दे बसंती’मुळे अरवली पर्वतांमधला नाहरगढ फोर्ट अनेक पर्यटकांना माहितही झाला आणि या ठिकाणांना भेट देणा-यापर्यटकांचीही संख्या वाढली आहे. शुद्ध देसी रोमान्स चित्रपटाची सगळी गोष्टच जयपूर शहरामध्ये घडते. या शहराला निसर्गसौंदर्याचं फारसं वरदान नाही, पण ऐतिहासिक वारशामुळे हे शहर भारताच्याच नाही तर जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर ठळक उठून दिसतं.ही ठिकाणं प्रवासाच्या दृष्टिनंही सोयीची आणि बजेटमध्येही बसणारी आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत जर कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर या ठिकाणांचा विचार करायला हरकत नाही.