ख्रिसमस आणि नविन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवस राहीले आहेत. सगळे लोकं कुठे फिरायला जाता येईल का याचा विचार करत आहेत. तुम्ही सुध्दा जर कुठे जायचा प्लॅन करत असाल तर वेळ न घालवता तयारीला लागा. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अश्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही थंडीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. तसंच या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला येणारं नविन वर्ष लक्षात राहील. चला तर मग जाणून घेऊया भारतातील अशी कोणती ठिकाणं आहेत.
गोवा
हा ख्रिसमसचा सण जर तुम्ही गोव्यात साजरा केलात तर तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. गोव्याला ज्याप्रकारे ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं हे संपुर्ण भारतात प्रसिध्द आहे. गोव्याला डिसेंबरच्या आगमनापासूनच सेलिब्रेशन करायला सुरूवात होते. इथल्या अनेकविध बीचवर लोक डान्स, म्यूझिक आणि विविधतेने परिपूर्ण असलेल्या गोव्याच्या सी फूडचा आनंद घेतात. ख्रिसमसच्यावेळी गोव्यातले चर्चमध्ये वाजणारे संगीत आणि ख्रिसमस ट्री पाहून वेगळ्याच दुनियेत गेल्याचा अनुभव मिळतो. सोळाव्या शतकातील सगळ्यात मोठा कॅथलरेड चर्च या ठिकाणी आहे.
कोलकाता
तुम्ही ऐकलं असेल की बंगालमध्ये दुर्गापुजा ही खूप उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. तसंच या ठिकाणी ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुध्दा प्रसिध्द आहे. इंग्रजांच्या काळापासूनच या ठिकाणी ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. या ठिकाणी इंग्रज अधिकारी खाण्यापिण्याचा आणि डान्सचा आनंद घ्यायचे. त्यामुळे आजही या ठिकाणच्या रस्त्यांवरच्या पार्कचा नजारा पाहण्यासारखा असतो.
कोलकाता येथिल सेंट पॉल कॅथेड्रल चर्चमध्ये खूप गर्दी असते. या ठिकाणी जुन्या बेकरीज् खूप आहेत. इथे गेल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केक्स खाण्याचा आनंद घेऊ शकता. पश्चीम बंगाल समिती कोलकाता यांच्या कडून या ख्रिसमसच्या फेस्टचं आयोजन केलं जातं.
शिमला
तुम्हाला थंड हवेचं ठिकाण खूप प्रिय असेल तर भारतातलं शिमला मनाली हे ठिकाणं पर्यटनासाठी उत्तम आहे. जर या ट्रिपला तुम्हाला आणखी रोमॅन्टीक बनवायचं असेल तर तुम्ही कालका ते शिमला पर्यंत असलेल्या टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. या ठिकाणी दर्जेदार हॉटेल्स आहेत. जिथे जाऊन तुम्हाला खवय्येगिरी करण्याचा आनंद घेता येईल.
जर तुम्हाला ऐतिहासीक वास्तुंना भेटी द्यायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक बोनस पॉईन्ट आहे. या ठिकाणी ब्रिटिशांनी तयार केलेल्या अनेक इमारती आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात तयार करण्यात आलेलं क्राइस्ट चर्च येथे आहे. या ठिकाणी तुम्ही ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.
कोच्ची
भारतातल्या कोच्ची या ठिकाणी पुरातन काळातसले खूप चर्च आहेत. जर ख्रिसमसच्या काळात तुम्ही या ठिकाणी गेलात तर सजवलेली दुकानं, जीजसच्या आकर्षक मुर्त्या तुम्हाला जागेजागी पहायला मिळतील. इथे गेल्यानंतर तुम्ही अर्ध्यारात्री सेंट फिचर्स या चर्चला जाऊन अविस्मरणीय ख्रिसमस साजरा करू शकता. या ठिकाणी सगळ्यात जुने युरोपिन चर्च आहेत.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी वेगवेगळे फेस्ट असतात. तसंच कोच्ची कर्निवससुध्दा असतो. तसंच इथे स्पोर्टस, गेम्स यांसारखे उपक्रम होतात. इतकंच नाही तर या ठिकाणचे प्रसिध्द असणारे कथकली आणि मोहिनी अट्टम हे नृत्यप्रकार सादर केले जातात.