शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासात ‘मोशन सिकनेस’नं तुम्ही हैराण होता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 13:05 IST

या आठ गोष्टी करा आणि बिनधास्त बॅग उचलून निघा..

ठळक मुद्देप्रवासात आपलं सिट काळजीपूर्वक निवडा. ज्या ठिकाणी आपल्याला धक्के बसणार नाही, आरामशीरपणे प्रवास होईल अशीच जागा तुम्ही निवडायला हवी.बसण्याची जागा कुबट, वास येणारी असली तर त्याचा नॉशिया येतो, मळमळ होते, उलटीही. असा बिकट प्रसंग टाळण्यासाठी फ्रेश हवा हा उत्तम उपाय आहे.प्रवासाला निघताना टेन्शन घरी ठेवा आणि निसर्गाचा आनंद घेत मस्तपणे एन्जॉय करा.

- मयूर पठाडेप्रवास करणं प्रत्येकालाच आवडतं, पण हा प्रवास जर रोजचाच असेल, तर त्याचा नुसता कंटाळाच नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्याही तो बरोबर घेऊन येतो. प्रवासादरम्यान ‘मोशन सिकनेस’ तर अनेकांना जाणवतो आणि त्यावर मग आराम केल्याशिवाय आणि बºयाचदा डॉक्टरांकडे गेल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.मोशन सिकनेस टाळण्यासाठी काय कराल?१- कुठल्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपली रात्रीची झोप पूर्ण आणि अगदी व्यवस्थित झालेली असली पाहिजे याकडे कटाक्षानं लक्ष द्या. मोशन सिकनेसचा त्रास त्यामुळे जाणवणार नाही.२- अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पण प्रवासात त्या तुमच्याजवळ असल्याच पाहिजे. टिश्यू पेपर, सिक बॅग, पाण्याची बाटली आणि आपला जेवणाचा डबा. अनेक विपरित गोष्टी त्यामुळे तुम्हाला टाळता येतील.३- बस असो, रेल्वे असो किंवा जहाज.. कुठल्याही प्रकारचा प्रवास असला तरी आपलं सिट काळजीपूर्वक निवडा. अगोदरच बुकिंग करून ठेवलेलं असलं तर केव्हाही चांगलं. ज्या ठिकाणी आपल्याला धक्के बसणार नाही, आरामशीरपणे प्रवास होईल अशीच जागा तुम्ही निवडायला हवी.४- प्रवासात ज्या ठिकाणी त्यातल्या त्यात प्रमाणात फ्रेश हवा मिळेल अशाच ठिकाणी बसावं. बसण्याची जागा कुबट, वास येणारी असली तर त्याचा नॉशिया येतो, मळमळ होते, उलटीही. असा बिकट प्रसंग टाळण्यासाठी फ्रेश हवा हा उत्तम उपाय आहे.५- टेन्शन प्रत्येकालाच असतं, पण प्रवासाला निघताना ते घरी ठेवा आणि प्रवासाचा, निसर्गाचा आनंद घेत मस्तपणे एन्जॉय करा.६- स्वत:लाही मुक्त ठेवा. प्रवासातही व्हॉट्स अ‍ॅप, वाचन, व्हीडीओ गेम्स.. कशाला हव्यात या गोष्टी? त्यापेक्षा आपल्या बरोबरच्या लोकांशी मस्त गप्पा मारा. हसीमजाक, काव्य, गाणी याचा आस्वाद घेत आपला प्रवास संस्मरणीय करा.७- स्वत:ला कायम हायड्रेटेड म्हणजे शरीरातील पाणी कमी पडणार नाही याकडे लक्ष द्या. सतत पाणी पित राहा.८- डॉक्टरांकडून तपासणी आणि आपली अत्यावश्यक औषधेही आठवणीनं सोबत ठेवा.