शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फॅशन फ्रीक असाल तर या फॅशनेबल सीटी कधीतरी पाहायलाच हव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 18:32 IST

कला, संस्कृती, आरोग्य यासोबतच फॅशन हा ही पर्यटनातला एक नवा ट्रेण्ड आहे. कुठे काय फॅशन आहे हे बघण्यासाठीही पर्यटन केलं जातं. अर्थात यासाठी जगाच्या पाठीवर निवडक देश आणि शहरं आहेत. ती फिरली की फॅशनच्या जगात कोणता ट्रेण्ड आहे हे सहज कळतं.

ठळक मुद्दे* जगातल्या फॅशनेबल शहरांच्या यादीत न्यूयॉर्कचं नाव आघाडीवर आहे. वेगवेगळ्या तहेच्या लुकसाठी      लागणा-याट्रेण्डी कपड्यांच्या व्हरायटी तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये नक्की पाहायला मिळतील.* फॅशनच्या बाबतीत पॅरिसच्या बरोबरीनं ज्या शहराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे मिलान. न्यूयॉर्क, पॅरिस फॅशन वीकप्रमाणे मिलान फॅशन वीकही जगप्रसिद्ध आहे. या फॅशन वीकमधून फॅशनचे नवनवीन ट्रेण्ड सेट होतात.* फॅशनची पंढरी जर पॅरिस असेल तर लंडनला आळंदी म्हणायला नक्कीच हरकत नाही. स्ट्रीट फॅशनपासून स्टुडिओ फॅशनपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशन तुम्हाला लंडनमध्ये पाहायला मिळतात.

- अमृता कदमआपल्याकडे फॅशन म्हटलं की बॉलिवूड हेच समीकरण पक्कं आहे. पण जगात अशी अनेक शहरं आहेत जी फॅशनचा ट्रेण्ड सेट करत असतात. खरंतर हल्ली पर्यटन म्हणजे फक्त फिरण्याचा आनंद घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेलं नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी पर्यटन केलं जातं. कला, संस्कृती, आरोग्य यासोबतच फॅशन हा ही पर्यटनातला एक नवा ट्रेण्ड आहे. कुठे काय फॅशन आहे हे बघण्यासाठीही पर्यटन केलं जातं. अर्थात यासाठी जगाच्या पाठीवर निवडक देश आणि शहरं आहेत. ती फिरली की फॅशनच्या जगात कोणता ट्रेण्ड आहे हे सहज कळतं. त्यामुळं तुम्हीही जर फॅशन फ्रीक असाल, फॅशनच्या दुनियेत काय काय सुरु आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर जगातल्या ‘मोस्ट फॅशनेबल’ शहरांना भेट द्यायलाच हवी.1. न्यूयॉर्क

इथली फॅशन पहायची असेल तर तुम्हाला रॅम्पवर चालणा-या मॉडेल्स पाहण्याची गरज नाहीये. रस्त्यांवरु न फिरणा-या लोकांकडे नजर टाकलीत तरी तुम्हाला कळेल की हे लोक फॅशनच्या बाबतीत किती सजग आहेत. त्यामुळेच जगातल्या फॅशनेबल शहरांच्या यादीत न्यूयॉर्कचं नाव आघाडीवर आहे. वेगवेगळ्या त-हेच्या लुकसाठी लागणा-या ट्रेण्डी कपड्यांच्या व्हरायटी तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये नक्की पाहायला मिळतील.

 

2. पॅरिस

कला, स्थापत्य, साहित्य यासोबतच पॅरिस प्रसिद्ध आहे इथल्या फॅशनसाठी. केवळ आजच नाही तर अगदी ऐतिहासिक काळापासून पॅरिस फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. अनेक नामांकित क्लोदिंग आणि अक्सेसरीचे ब्रॅण्ड पॅरिसमधलेच आहेत. त्यामुळेच फॅशनच्या दुनियेत पॅरिसची फॅशन कधीच आउटडेटेड होत नाही. पॅरिस फॅशन वीकमध्ये आपला सहभाग नोंदवणं हे फॅशन डिझायनर्ससाठी स्वप्नवत आणि अभिमानास्पद असतं.

3. मिलान

फॅशनच्या बाबतीत पॅरिसच्या बरोबरीनं ज्या शहराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे मिलान. न्यूयॉर्क, पॅरिस फॅशन वीकप्रमाणे मिलान फॅशन वीकही जगप्रसिद्ध आहे. या फॅशन वीकमधून फॅशनचे नवनवीन ट्रेण्ड सेट होतात. मिलानमधली फॅशन महिन्यांच्या नाही तर अगदी दिवसांच्या हिशोबात बदलत राहाते. मिलानमधल्या फॅशन इन्स्ट्यिूटही प्रसिध्द आहेत.

 

4. टोक्यो

जपान त्याच्या पारंपरिकतेसाठी ओळखला जात असला तरी फॅशनच्याबाबतीतही अग्रेसर आहे. पारंपरिक आणि नवतेचा संगम साधत इथली फॅशन बहरली आहे. सध्या चलतीत असलेल्या क्रॉप टॉप्सचा उगमही टोक्योमधूनच झाला आहे. त्यामुळे नवनवीन फॅशन्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर टोक्योला आवर्जून भेट द्यायला हवी.

5. लंडन

फॅशनची पंढरी जर पॅरिस असेल तर लंडनला आळंदी म्हणायला नक्कीच हरकत नाही. स्ट्रीट फॅशनपासून स्टुडिओ फॅशनपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशन तुम्हाला लंडनमध्ये पाहायला मिळतात. इथल्या एका व्यक्तीनं केलेली फॅशन ही दुस-या व्यक्तीसारखी अजिबातच नसते.

 

6. रोम

मिलानबरोबरच इटलीची राजधानी रोमही फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. इथली फॅशन जगभरातले लोक बिनदिक्कतपणे फॉलो करतात. इथे सर्वचजण फॅशनचे जाणकार आहेत. रोम मध्ययुगीन स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर फॅशनच्या दुनियेतही रोमचं नाव आदरानं घेतलं जातं. इतिहासाबरोबरच सध्या फॅशनच्या दुनियेत काय चाललंय हे माहित करून घ्यायचं असेल तर रोमची वारी एकदा तरी करायला हवी.

 

7. नैरोबी

केनिया या आफ्रिकेतल्या देशाची ही राजधानी. हे नाव वाचून तुम्हाला कदाचित आपली काहीतरी गफलत होतीये असं वाटू शकतं. पण फॅशनच्या दुनियेत या शहराचं नाव आघाडीवर आहे. जगातले अनेक आघाडीचे फॅशन डिझायनर नैरोबीचे आहेत. नैरोबी केवळ स्टुडिओ फॅशनसाठीच प्रसिद्ध नाहीये तर इथली स्ट्रीट फॅशनही पर्यटकांना आकर्षून घेते. नैरोबीमध्ये वर्षातून एकदा फॅशन मार्केटही लागतं ज्यामध्ये वेगवेगळे डिझायनर्स आपलं कलेक्शन सादर करतात. तुम्ही केनियन वाइल्ड लाइफ सफारीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. पण केनियामध्ये गेल्यावर केवळ जंगलाचं सौंदर्य न पाहता थोडीशी जिवाची चैन आणि फॅशनही नक्की करु न पहा.

8. स्टॉकहोम

स्वीडनची राजधानी स्टॉकहोमसुद्धा फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. लंडन, पॅरिसप्रमाणे स्टॉकहोमचा फॅशन सेन्सही वाखाणला जातो. त्यामुळं इथं फिरतानाही फॅशनचे नवनवे ट्रेण्ड तुम्हाला नक्की पाहायला मिळतील.