शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पर्यावरण जपण्यासाठी धडपडणारी 7 ठिकाणं. पर्यावरण आणि पर्यटन याचा समतोल कसा राखावा हे यांच्याकडून शिका! -

By admin | Updated: June 21, 2017 18:36 IST

पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोलकसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

-अमृता कदम

आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा स्वत:ची, आपल्या सामानाची नीट काळजी घेतो. पण आपण जिथे फिरायला गेलो आहोत, त्या ठिकाणाची, तिथल्या निसर्गाची आणि पर्यावरणाचीही आपण तितकीच काळजी घेतो का? सध्याच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास वेगानं होतो आहे. आणि यात बेजबाबदार पर्यटनाचा वाटाही मोठा आहे. आणि म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या उपायात जबाबदार पर्यटन हाही एक उपाय आहे.

पर्यटन करताना, निसर्गाचा आनंद उपभोगताना आपण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं भान बाळगणं गरजेचं आहे. त्यातूनच ‘शाश्वत पर्यटना’ची संकल्पना उदयाला आली आहे. शाश्वत पर्यटनामध्ये पर्यटनस्थळाच्या नैसर्गिक, सामाजिक आणि कलात्मक पर्यावरणाला कोणत्याही पद्धतीनं बाधा उत्पन्न न करणं आणि पर्यटनाचा पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम होईल हे पाहणं अपेक्षितआहे. शाश्वत पर्यटनाच्या याच संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 2017 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्षाचं औचित्य साधत वान्डरट्रेल या पर्यटनविषयक आॅनलाइन पोर्टलनं भारतातल्या सात इको-फ्रेंडली पर्यटनस्थळांची यादी दिली आहे. याठिकाणी पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा समतोल कसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

पर्यटनाचा उद्देश असतो तो आनंद मिळवणं. पण आपला आनंद उपभोगताना आजूबाजूच्या पर्यावरणाला जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या पर्यावरणावरच तर अवलंबून असतो. पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पुढाकार घेणारी ही गावं आपल्याला प्रकर्षानं या वास्तवाची जाणीव करुन देतात. 1) उरवू बाम्बू व्हिलेज, वायनाड ( केरळ)

बांबूवर आधारित हस्तोद्योग आणि बांबू हाऊसमधील स्टे यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेलं हे गाव इको-फ्रेंडली पर्यटनासाठीचं एकदम आदर्श उदाहरण आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या बांबूंच्या घरात राहतात, घरगुती पद्धतीचंच जेवण जेवतात. इथल्या हस्तोद्योगांच्या कारखान्याला भेट देतानाच स्थानिक जीवनशैली आणि त्यांच्या जीवनशैलीत असलेलं बांबूचं महत्त्व जाणून घेतात. पर्यटनामुळे या छोट्याशा गावाचा आर्थिक विकासही साध्य होत आहे. जेव्हा केव्हा तुम्ही केरळची ट्रीप प्लॅन कराल, तेव्हा एक-दोन दिवस या गावासाठी राखून ठेवायलाही विसरु नका.

2) शोला शॅक, वायनाड (केरळ)

केरळमधलं अजून एक निसर्गसंपन्न गाव. इथे तुम्ही इथल्या स्थानिक लोकांसोबत कम्युनिटी लिव्हिंगचा अनुभव घेऊ शकता. इथल्या आदिवासी जमातींचं संगीत आणि लोककलांचाही आनंद तुम्हाला घेता येतो. या गावाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक घरात इको-फ्रेंडली टॉयलेट बांधलेलं आहे. पर्यटनातून जो पैसा मिळतो त्यातला बराचसा भाग हा इथल्या आदिवासींच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी वापरला जातो.

 

3) वनघाट, जिम कॉर्बेट ( उत्तराखंड)

निसर्गप्रेमी आणि संरक्षक सुमंत यांनी वनघाटला पर्यावरणस्नेही बनवण्याची संकल्पना मांडली. इथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची जवळीक अनुभवायला मिळावं हाच त्यामागचा उद्देश. वनघाटमध्ये फिरणं म्हणजे इथल्या समृद्ध जैववैविधतेला जवळून अनुभवण्यासारखं आहे. वनघाटमध्ये तुम्ही कोणत्याही स्टर हॉटेल्समध्ये राहत नाही तर इको-फ्रेंडली घरांमध्येच राहता. इथे मिळणारी शांती तुम्हाला एक वेगळाच आत्मिक आनंद मिळवून देते.

4) फार्म कँप, मिसनागुडी ( तामिळनाडू)

नावावरूनच हा अग्रो-टूरिझमचाच एक प्रकार असल्याचं लगेच लक्षात येतं. ‘फार्म टू प्लेट’ या संकल्पनेवरच इथल्या पर्यटनाचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे. फार्म टू प्लेट’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हातभार लावण्याची संधीही तुम्हाला फार्म कँपमध्ये मिळते. दुभत्या जनावरांना चारा घालणं, दुधाच्या धारा काढणं, अंडी गोळा करु न आणणं, शेतावर जाणं या सगळ्या गोष्टी फार्म कँपमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता.

5) सेव्हाग्राम, गढवाल (उत्तराखंड)

सेंद्रिय शेती हे इथलं वैशिष्ट्य. कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता पिकवलेल्या भाज्या खाणं हे हायब्रीड धान्य, भाज्या खाणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी खास अनुभवच म्हणायला हवा. पर्यटनातून येणारा महसूल या गावातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी खर्च होतो. सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जाणवून देण्यात या गावाचं योगदान विचारात घेऊनच त्याचा समावेश पर्यावरणस्नेही पर्यटनस्थळात केला गेला आहे.

6) मानेलँड ( गुजरात)

गीरमधलं हे ठिकाण सर्वार्थानं इको-फ्रेण्डली आहे. हे गीर जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण आहे जे स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा वापर कंपोस्ट तयार करण्यासाठी करतं, ज्यांचा उपयोग तिथल्या झाडांसाठी केला जातो. आता या गावाचं पुढचं लक्ष आहे ते सोलर हिटर्स आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग! त्यामुळे गीरच्या अभयारण्याला भेट देण्याचं ठरवत असाल तर तुमच्या प्लॅनिंगमध्ये या गावासाठीही एक दिवस राखून ठेवायला हरकत नाही.

 

           

7)सराई कोठी (मध्य प्रदेश)

इथे वन्यजीव संवर्धनासाठी स्थानिकांची मदत घेतली जाते, त्यांना या कामात सामावून घेतलं जातं. त्यामुळे वनसंपदेचा गैरवापर आणि नुकसानही टळतं.