भारतात अनेक ऐतिहासीक किल्ले आहेत. पण आजपर्यंत तुम्ही जितके किल्ले पाहिले ते सगळे जमिनीवर असतील. आज आम्ही तुम्हाला ज्या किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. तो खूप अनोखा आणि वेगळा आहे. हा भारतातील एकमेव किल्ला आहे जो जमिनीवर नाही तर चक्क जमिनीच्या खाली आहे.
जवळपास ४०० वर्ष जुन्या या किल्ल्याला अफगाणी शासनकर्ता शेरशह सुरी याने तयार केले होते. म्हणूनच या किल्ल्याला शेरगडचा किल्ला असं म्हटलं जातं. या किल्ल्यात शेकडो तळघरं आणि भूयारी मार्ग सुद्धा आहेत. या ठिकाणचे भूयारी मार्ग कुठे सुरू होतात याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही.
बिहारच्या या कॅमूर पर्वतावर असलेल्या या किल्ल्याला अशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे की बाहेरून या किल्ल्याला कोणीही पाहू शकणार नाही. चारही बाजूनीं उंचच उंच भिंतीनी घेरलेला हा किल्ला आहे. आजूबाजूला जंगल सुद्धा आहेत. एकाबाजूने दुर्गावती नदी वाहत असते. या किल्ल्याच्या चारही बाजूला भूयारी मार्गांचं जाळ तयार झालं आहे. या किल्ल्याच्या आत जाण्यासाठी सुद्धा याच मार्गातून जावं लागतं. जर ही भूयारी मार्ग बंद झाला तर किल्ला दिसत सुद्धा नाही.
शेरशाह सुरी याने हा किल्ला आपल्या शत्रुंपासून वाचण्यासाठी तसंच सुरक्षित राहण्यासाठी तयार केला होता. हा व्यक्ती आपले सैनिक आणि कुटूंबासह या ठिकाणी राहत होता. या किल्ल्याला अशा पद्धतीने बनवण्यात आलं होतं की किल्ल्याच्या दिशेने १० किलोमीटरपासून जरी शत्रु येत असेल तरी दृष्टीस पडेल. ( हे पण वाचा-अहमदनगरमधील ५०० वर्षाचा इतिहास असलेला 'हा' किल्ला पाहिला का? नसेल तर लगेच करा प्लॅन!)
या किल्ल्यातील तळघरात १० हजारांपेक्षा जास्त सैनिक थांबायचे. अनेक दिवसांचं अन्नपाणी या ठिकाणी स्टोर केलं जात होतं. या ठिकाणी अनेक वर्ष जुनी विहिर सुद्धा आहे. जवळपास ४०० वर्ष आधी या रहस्यमय किल्ल्यात तयार झालेला भूूयारी मार्ग कठिण काळात किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आली होती. शत्रुंना शिक्षा देण्यासाठी तळघर तयार करण्यात आली होती. या किल्ल्याबद्दल अधिक माहिती ही इतिहासकरांकडे सुद्धा नाही. पण यांच्यामते राजा शाहबाद यांना त्यांचे प्रिय मित्र खरवार राजा गजपती यांनी भेट म्हणून हा किल्ला दिला होता. (हे पण वाचा- Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन)