शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साहित्य अकादमी

साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्यिक संस्था आहे. अकादमी भारतीय भाषांतील साहित्याचे संवर्धन करून प्रोत्साहन देते. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत पुरस्कार, फेलोशिप्स, अनुदान, प्रकाशने, साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शन अकादमी आयोजित करते. तसेच विविध देशांसमवेत साहित्यिक देवाणघेवाण कार्यक्रमही आयोजित केले जातात. यासोबतच साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशातील २४ भाषांतील साहित्यिकांना दरवर्षी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिला जातो.

Read more