शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे, तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 03:30 IST

स्थानिक शिवसेना नेत्यांच्या आग्रहानुसार यावेळी भाजपाने उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊन जिल्हा परिषदेवर पुन्हा अडीच वर्षे भगवा फडकणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे, तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग पाहून यावेळी उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीची शिवसेनेने अपेक्षानुरूप आगामी काळात दोन विषय समित्यांचे सभापतीपद देण्यात येईल, असे सांगून बोळवण केली. यामुळे या खेपेला शिवसेना जि.प. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ठेंगा दाखविणार, हे लोकमतचे वृत्त खरे ठरले. येथील एनकेटी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रि या बुधवारी पार पडली.स्थानिक शिवसेना नेत्यांच्या आग्रहानुसार यावेळी भाजपाने उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊन जिल्हा परिषदेवर पुन्हा अडीच वर्षे भगवा फडकणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीनंतर सध्या कार्यरत असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रि या पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी घोषित केले.नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. या आधी सेनेच्याच दीपाली पाटील अध्यक्ष होत्या. तर, विद्यमान उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. ते यावेळी पुन्हा उपाध्यक्ष झाले आहेत.राष्ट्रवादीला दोन सभापतीपदे मिळणारसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाआघाडी गठीत करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सकाळी बैठक होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष-उपाध्यक्ष उमेदवार देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या या सत्तेत राष्ट्रवादीला दोन सभापतीपदे मिळणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना