शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षांची निवडणूक १५ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:00 IST

अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया ५ जुलैला होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व पदांच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया ५ जुलैला होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिकनिवडणुका २०१७ मध्ये पार पडल्या. त्यावेळी अडीच वर्षांसाठी अध्यक्षांसह पंचायत समिती सभापतीपदासाठी निवडणुका घेतल्या होत्या. यात अध्यक्षपदासाठी महिला एसटी संवर्ग आरक्षण जाहीर झाले होते.आता येत्या १५ जुलै रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व ८ जुलै रोजी पंचायत समिती सभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा नुकतीच झाली आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले असून शहापूर पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती (महिला), अंबरनाथ पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती (महिला), मुरबाड सभापतीपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, कल्याण सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला आणि भिवंडी सभापतीपदासाठी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.दरम्यान, निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सगळेच तयारीला लागले आहेत.>प्रशासनाकडून हालचाली सुरूजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ या तीन पंचायत समिती सभापतीपदांवर महिला आरक्षण पडले आहे. त्यात आता जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, १५ जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले आहे.पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार हे पीठासीन अधिकारी असतील. अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रि या ५ जुलैला होणार असल्याची माहिती तहसीलदार (सा.प्र) राजाराम तवटे यांनी दिली.